भीमेवरील कुगाव ते शिरसोडी पुलाचे काम सुरू ;उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या मागणीला यश

इंदापूरच्या व्यापार, दळणवळणात वाढ होणार..

भीमेवरील कुगाव ते शिरसोडी पुलाचे काम सुरू ;उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या मागणीला यश

इंदापूरच्या व्यापार, दळणवळणात वाढ होणार..

इंदापूर प्रतिनिधी –

इंदापूर नगरीचे उपनगराध्यक्ष भरत शहा हे नेहमीच इंदापूर नगरीचा विचार करून भविष्यातील जडणघडण करत असतात, शहर व परिसराचा विकास वेगाने वाढवायचा असेल तर भीमा नदीवर पूल होणे गरजेचे आहे, हा पूल झाल्यानंतर शहरातील व्यापारी दळणवळण तसेच पर्यटनाचा विकास होईल या दृष्टीने विचार करून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी तसेच सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी संदीप वाशिंबेकर, युवा उद्योजक भावेश ओसवाल व शहरातील व्यापारी संघटनेने लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहा यांच्या निवासस्थानी आल्यानंतर भीमा नदी वरती पूल व्हावा अशी मागणी या सर्वांनी अजित पवार यांच्याकडे केली होती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही गरज ओळखून तात्काळ यावरती उपाययोजना करीत निधी मंजूर केला होता, यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनीही पाठपुरावा केला आहे.आता या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव या भीमा नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या पुलामुळे उजनी धरणातील पर्यटनाला चांगली चालना मिळण्यास मदत होणार आहे. इंदापूर शहरातील बाजारपेठेतील व्यापारवाढीसाठीही या पुलामुळे वाढणार्‍या दळणवळणाचा फायदा होईल.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात करमाळा तालुक्यातील गावांना इंदापूर तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असणार्‍या गावात जाण्यासाठी रस्ते मार्गाने 80 ते 90 कि. मी. भिगवण, टेंभुर्णी येथून वळसा घालून किंवा जीव धोक्यात घालून जलमार्गाने प्रवास करावा लागतो. आत्तापर्यंत जलवहातुकीमध्ये 40 हून अधिक प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे.

उपनगराध्यक्ष भरत शेठ यांची मागणी तात्काळ लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तसेच विधानसभेत याचा पाठपुरावा करून विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुलाच्या कामाला मंजुरी देऊन 23 ऑगस्ट 2024 रोजी भूमिपूजन केले होते.

आता या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने दोन्ही काठच्या ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. हा पूल झाल्यानंतर मोठी अडचण दूर होणार आहे. हा पूल झाल्यावर पर्यटन, मत्स्य व्यवसाय, पक्षी निरीक्षण, कृषी व दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी चालना मिळणार आहे.

भरत शहा हे इंदापूरच्या नागरिकांसाठी किती दूरदृष्टीचे लोकनेते आहेत हेच या शिरसोडी कुगाव पुलाच्या उदाहरणावरून इंदापूर शहरातील जनतेला कळाले आहेत.. त्यामुळे इंदापूरची जनता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भरत शहा यांना साथ देतील यात शंका असण्याचं काहीच कारण नाही..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram