अंकीता पाटील यांना साद फाऊंडेशनचा “इंदापूरभुषण” पुरस्कार
राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट काम पहाता पुरस्कार प्रदान

अंकीता पाटील यांना साद फाऊंडेशनचा “इंदापूरभुषण” पुरस्कार
राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट काम पहाता पुरस्कार प्रदान
इंदापूर : प्रतिनिधी
साद फाऊंडेशन,इंदापूर या बहुउद्देशीय संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंकीता हर्षवर्धन पाटील यांचा नऊदारे येथील कार्यक्रमात वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते “इंदापूरभुषण” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
लासुर्णे गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष लोंढे, ग्रामपंचायत सदस्य दिपक लोंढे, सिध्दार्थ भोसले,अंथुर्णेचे माजी उपसरपंच संजय वंसाळे,सविताताई राक्षे, पोलीस कॉन्स्टेबल साळवे , शुभम सुर्वे,श्री.कदम,आबा बनसोडे,शरद गोतसुर्य, चैतन्य बनसोडे, आकाश भोसले, अनिल बनसोडे,बी.एम.कांबळे, सदाशिव सुर्यगंध ,सौरभ धनवडे,ऋतुज वनसाळे,गोपी जावीर यावेळी उपस्थित होते.अंकीता पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साद फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज वनसाळे, संस्थेचे ट्रस्टी आप्पा कदम, नागेश भोसले, दत्तात्रय राक्षे, क्षितीज वनसाळे, अनिल केंगार, कोमल वनसाळे, योगिता भोसले, सचिन माने, अजय फले, बापुसाहेब जाधव यांनी परिश्रम घेतले.आभार बी.एम.कांबळे सर यांनी मानले.