भ्रष्टाचार निर्मुलन समितीची आढावा बैठक संपन्न
जोपर्यंत त्याचे निराकारण होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल.
भ्रष्टाचार निर्मुलन समितीची आढावा बैठक संपन्न
जोपर्यंत त्याचे निराकारण होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मुलन समितीची आढावा बैठक उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसिल कार्यालयामध्ये पार पडली.
यावेळी तहसिलदार तथा समितीचे सदस्य सचिव विजय पाटील, सहायक गटविकास अधिकारी अभिमान माने, निवासी नायब तहसिलदार विलास करे, अशासकीय सदस्य हणूमंत नारायण निंबाळकर, ॲड. राहूल वाबळे, तानाजी मोकासी, दत्तात्रय लोणकर आदी उपस्थित होते.
बैठकीत समितीचे अध्यक्ष श्री. कांबळे यानी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या कार्यक्षेत्राबाबत माहिती दिली. तीन महिन्यातून एकदा या समितीची आढावा बैठक घेण्यात येईल. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविषयी काही तक्रारी असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल आणि जोपर्यंत त्याचे निराकारण होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल.
सदस्यांकडे येणाऱ्या तक्रारी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनी तहसिल कार्यालयात सादर कराव्यात जेणे करुन त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.