मतदार जनजागृतीकरीता तृतीयपंथीयांची रॅली संपन्न
तृतीयपंथी मतदारांनी आम्ही मतदान करणार आहोत, आपणही येत्या 20 नोव्हेंबर रोजी आवर्जून मतदान करा, असा संदेश दिला.
मतदार जनजागृतीकरीता तृतीयपंथीयांची रॅली संपन्न
तृतीयपंथी मतदारांनी आम्ही मतदान करणार आहोत, आपणही येत्या 20 नोव्हेंबर रोजी आवर्जून मतदान करा, असा संदेश दिला.
बारामती वार्तापत्र
बारामती विधानसभा मतदारसंघातील सामाजिक न्याय विभागाचे मुलींचे शासकीय वसतिगृह येथे तृतीयपंथीसाठी (पारलिंगी) मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, जिल्हा तृतीयपंथी स्वीप समन्वयक तथा सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व तृतीयपंथी मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेण्याकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले.
तृतीयपंथी मतदारांनी आम्ही मतदान करणार आहोत, आपणही येत्या 20 नोव्हेंबर रोजी आवर्जून मतदान करा, असा संदेश दिला. ‘मी नारी सगळ्यात भारी, मी मतदान करणारच… ताई, वहिनी, मावशी, आजी, मतदानाला चला! ‘ सोडा सगळे काम धाम…. मतदान करणे पहिले काम’ अशा आशयाच्या फलकांच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याबाबत आवहन करण्यात आले.
या रॅलीमध्ये वसतीगृहाच्या कर्मचारी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या रॅलीचे नियोजन सविता खारतोडे, दिपाली निवसे यांनी केले.