बारामतीतील तालुक खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी ॲड. रवींद्र माने, तर व्हॉइस चेअरमनपदी नितीन देवकातेंची बिनविरोध निवड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बद्दल

बारामतीतील तालुक खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी ॲड. रवींद्र माने, तर व्हॉइस चेअरमनपदी नितीन देवकातेंची बिनविरोध निवड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बद्दल
बारामती वार्तापत्र
बारामतीतील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ॲड .रवींद्र महादेवराव माने तर व्हॉइस चेअरमन म्हणून नितीन रामचंद्र देवकाते यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
बारामती तालुका खरेदी विक्री संघ या संस्थेच्या संस्थेच्या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.
त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार चेअरमन म्हणून ॲड .रवींद्र माने आणि व्हाईस चेअरमन म्हणून नितीन देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रिया बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ येथे पार पडली. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, दूध संघाचे संघाचे चेअरमन संजय कोकरे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे, उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. संस्थेचे नूतन चेअरमन रवींद्र माने यांनी सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल तसेच संस्था प्रगतीपथावर नेली जाईल असे आश्वासन यावेळी दिले.
नूतन व्हॉइस चेअरमन नितीन देवकाते यांनी संस्थेच्या नवनवीन उपक्रम राबवत उत्पन्न मध्ये भर घालण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संधी दिल्याबद्दल चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांनी त्यांचे आभार मानले.