मतिमंद मुलांच्या पुनर्वसन केंद्रात मा.पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप
मतिमंद मुलांच्या पुनर्वसन केंद्रात मा.पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप
बारामती वार्तापत्र
बारामती मधील गोजुबावी येथे संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मतिमंद मुलांच्या पुनर्वसन केंद्रामध्ये देशाचे माजी कृषिमंत्री मा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त मतिमंद मुलांना फळे व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री अतिश गटकळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्याच बरोबर पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.त्यामध्ये श्री कोंडिराम साळवे, श्री लालासो जाधव,बद्रीनाथ जाधव, ऍड.गोपाळ भोसले,विकास कुंभार,उपस्थित होते.या सर्वांनी या सर्व मतिमंद विद्यार्थ्यांशी हितगुज केले.
तसेच पक्षाच्या माध्यमातून या विद्यार्थांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.पवारसाहेबांनी केवळ राजकारण करण्यापेक्षा समाजकारण जास्त केले तसेच समाजामध्ये सामाजिक समता निर्माण करण्याचे काम केले.
समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे काम त्यांनी केले.त्याच्या याच कामाचा आदर्श घेत त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत असल्याचे मत अतिश गटकळ यांनी मांडले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल जाधव यांनी सर्वांचे आभार मांडले.