कृषी

मत्स्य व्यवसाय मध्ये मधून रोजगार निर्मिती : नितीन पाटील

शेतकरी विद्यार्थी यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादन वाढीसाठी भरीव कामगिरी

मत्स्य व्यवसाय मध्ये मधून रोजगार निर्मिती : नितीन पाटील

शेतकरी विद्यार्थी यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादन वाढीसाठी भरीव कामगिरी

बारामती वार्तापत्र

मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत कृषि विज्ञान केंद्र बारामतीने आपल्या प्रक्षेत्रावर मत्स्य बीज निर्मिती केंद्र ,रोहू, कटला,चिलापी, रेड चिलापी,कोंबडा, मरळ या मासेंचे शेततळ्यात मासे पालन, एकात्मिक कोंबडी मत्स्य उत्पादन, बायोफ्लॉक, अक्वा पॉनिक्स, रंगीत मासे संघ्रालय,फिश फूड मिल,मोतीपलन ,खेकडा पालन,मत्स्य पाणी तपासणी प्रयोगशाळा,पिंजरा पद्धत मासे पालन,हे युनिट उभारणी करून शेतकरी विद्यार्थी यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादन वाढीसाठी भरीव कामगिरी केल्याबदल मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून कृषि महाविद्यालय पुणे येथे शनिवार दिनांक १२ जुलै २०२५ रोजी राष्ट्रीय मत्स्य दिना निमित्ताने कार्यक्रमात उत्कृष्ट कृषि विज्ञान केंद्र पुरस्कार देऊन सन्मानित केले.

मा.श्री.नितीन पाटील ( खासदार राज्य सभा व स्थायी समिती सदस्य राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड हैद्राबाद),श्री.गिरीराज अग्निहोत्री (विभागीय संचालक राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ पुणे),
डॉ.संजय खरात (सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ) आणि डॉ.विजय शिकरे (विभागीय उपायुक्त मत्स्य व्यवसाय पुणे) यांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलवडे , कृषि विज्ञान केंद्र प्रमुख डॉ.धीरज शिंदे यांनी पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button