मध्य प्रदेश मध्ये १८ कोटी ५० लाछा रूपयांच्या फसवणूकीतील आरोपीस बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या मदतीने अटक
ताब्यात घेवुन पुढील तपास कामी स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) यांचे ताब्यात देण्यात आले

मध्य प्रदेश मध्ये १८ कोटी ५० लाछा रूपयांच्या फसवणूकीतील आरोपीस बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या मदतीने अटक
ताब्यात घेवुन पुढील तपास कामी स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) यांचे ताब्यात देण्यात आले
क्राईम; बारामती वार्तापत्र
भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या पंजाब नॅशनल बॅंकेचे १८.५० कोटींचे धनादेश क्लोनिंग करून आयडीबीआय बॅंकेच्या मॅनेजरच्या मदतीने ओडिसा येथील एका व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. या प्रकरणात बॅंकेचा मॅनेजर अगोदरच पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र काटेवाडी येथील योगेश अजित काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती) हा फरार होता. त्याला बारामती पोलिसांनी पकडून भोपाळच्या टास्क फोर्सच्या ताब्यात दिले.
बारामती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी हा गुन्हा भोपाळ मध्ये घडला होता. त्याचा तपास स्पेशल टास्क फोर्स भोपाळ यांच्याकडे असून या प्रकरणात आयडीबीआय बॅंकेचा मॅनेजर सरोज महापात्रा याला पूर्वीच अटक केली आहे..
सदर आरोपीचा शोध घेणेकामी एसटीएफ भोपाळ येथील तपास पथकाने बारामती तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश दवाण सो यांना मदत मागितलेने पोलीस निरीक्षक व्याण सो यांनी तात्काळ रापोनि पोरे, योना बंडगर, पो कॉ कांबळे,पो कॉ सपकाळ मपोकों काळे यांना सुचना देदुन आरोपी नामे योगेश अजित काटे यारा ताब्यात घेण्यास सांगितले.
त्याप्रमाणे बारामती तालुका पोलीस ठाणेकडील पथकाने तांत्रीक बाबीवरून आरोपी यारा मोरगाव रोड ता. बारामती. येथुन ताब्यात घेवुन पुढील तपास कामी स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री.डॉ अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री.मिलींद मोहीते सो अप्पर पोलीस अधिक्षक
बारामती विभाग बारामती, श्री.नारायण शिसगावकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती ,श्री महेश व्याण सो पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, सहा.पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, पोलीस नाईक बंडगर य ज २२९७, पोलीस अंमलदार कांबळे व नं २७४८ पोलीस अंमलदार सपकळ यनं ४३३ महिला पोलीस अंमलदार काळे व नं २५१७ यांनी केलेली आहे.