मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता!,सचिन वाजे होणार माफिचा साक्षीदार
त्यांने ईडीला पत्र लिहिले आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता!,सचिन वाजे होणार माफिचा साक्षीदार
त्यांने ईडीला पत्र लिहिले आहे.
मुंबई : प्रतिनिधी
माफीचा साक्षीदार होण्याची सचिन वाझे याची तयारी आहे. तसे त्यांने ईडीला पत्र लिहिले आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात वाजे यांने ईडीकडे अर्ज सादर केला आहे. वाझे यासंदर्भात ईडीकडे 14 फेब्रुवारी रोजी आपलं म्हणणं मांडणार असल्याचंही कळतंय.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. (Sachin Vaze’s U-turn) तसे पत्रच वाझे याने ईडीला लिहिले आहे. आता ईडी यासाठी PMLA न्यायालयाची परवानगी घेईल. त्यानंतर वाझे याची साक्ष नोंदवली जाईल. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर इतरही अनेक नावे पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
वाझे, देशमुखांची चांदीवाल आयोगासमोर हजेरी
तत्पूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आज चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यात आलं. तर एका प्रतिज्ञापत्रात वाझेने सांगितलं की, त्याने अनिल देशमुख यांच्या निर्देशानुसारच बारमधून खंडणीची वसुली केली. इतकंच नाही तर अनिल देशमुख यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असंही वाझे याने म्हटल्याचं कळतंय. त्याचबरोबर वाझेनं असंही सांगितलं की, देशमुख यांनी आपल्या आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात जबरदस्ती वसूलीच्या खोट्या केसेस दाखल केल्या.
परमबीर सिंहांच्या आरोपानंतर प्रकरण उजेडात
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दावा केला होता की अनिल देशमुख यांनी वाझेला बार आणि हुक्का पार्लरमधून महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. सिंह यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाचा तपास करण्यासाठी जस्टिस के. यू. चांदीवाल कमिटीची स्थापना केली होती.