क्राईम रिपोर्ट

मर्डर केस मधील फरार आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

घरगुती कारणावरून आईचा केला मर्डर..तर वडिलांचा जीव घेण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत

मर्डर केस मधील फरार आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

घरगुती कारणावरून आईचा केला मर्डर..तर वडिलांचा जीव घेण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत

क्राईम;बारामती वार्तापत्र

वालचंद नगर पोलीस स्टेशन येथील मर्डर केस मधील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात यश आले आहे. या प्रकरणी अमित पांडुरंग नरुटे (वय:३१ वर्षे)(रा काझड, ता इंदापूर जि पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी वालचंदनागर मर्डर केस मधील आरोपीस शोधून त्यास तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार
नमूद गुन्ह्यातील आरोपी अमित नरुटे हा ठाणे रेल्वे स्टेशन येथे आल्याची माहिती एसडी पीओ
गणेश इंगळे यांना मिळाली. त्या अनुषंगाने तपास करीत असताना नमूद आरोपी हा रेल्वे ने पुणे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास खडकी रेल्वे स्टेशन येथे सापळा लावून ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे अमित पांडुरंग नरुटे (वय ३१ वर्षे)(रा काझड, ता इंदापूर जि पुणे) असे सांगितले. दरम्यान त्यास सदर गुह्याच्या कामी वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अमित नरुटे याने त्याचे आईचा शेतीचे वाटप व इतर घरगुती कारणावरून मर्डर केला असून वडिलांचा जीव घेण्याचे उद्देशाने गंभीर दुखापत केली आहे.त्यानुसार वालचंद नगर पोलीस स्टेशन मद्ये भाद वि कलम ३०२,३०७,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे, सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार महेश बनकर, हेमंत विरोळे ,पोलीस नाईक बाळासाहेब खडके रविराज कोकरे,अमोल शेडगे, सचिन घाडगे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, काशिनाथ राजापुरे यांनी केली

Related Articles

Back to top button