उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीतून पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संभाजी होळकर आणि दत्तात्रय येळे यांना उमेदवारी
राष्ट्रवादी कॉंग्रेसची बारामती तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीतून पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संभाजी होळकर आणि दत्तात्रय येळे यांना उमेदवारी
राष्ट्रवादी कॉंग्रेसची बारामती तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बारामतीतालुक्यातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि माजी संचालक दत्तात्रय येळे या दोघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार संग्राम थोपटे आमदार संजय जगताप रेवणनाथ दारवटकर माऊली दाभाडे हे सहा जण बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित मतदार संघातील सात जागी लढत होणार असून ब,क,ड, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व महिला प्रवर्गातील उमेदवारांच्या लढती होणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये बारामतीतून अजित अनंतराव पवार, आंबेगाव मधून दिलीप दत्तात्रय वळसे, भोर तालुक्यातून संग्राम आनंदराव थोपटे, पुरंदर मधून संजय चंद्रकांत जगताप, वेल्हे मतदारसंघातून रेवणनाथ कृष्णाजी दारवटकर, मावळ मतदार संघातून ज्ञानोबा सावळेराम दाभाडे हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
राष्ट्रवादीकडून इतर मागास प्रवर्गातून संभाजी होळकर यांना आणि भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून दत्तात्रय येळे यांना उमेदवारी
जाहीर करण्यात आली आहे. आज पुण्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.या बैठकीत जिल्हा बँकेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
संभाजी होळकर हे सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची बारामती तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या
बांधकाम व आरोग्य सभापती, होळ गावाचे सरपंच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्षपद यासह अनेक पदांवर काम केले आहे.
प्रशासकीय योजना, शैक्षणिक कार्य यासह सर्वसामान्यांशी संपर्कात असलेल्या संभाजी होळकर यांना पक्षाने संधी दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.