जागतिक पर्यावरण समजून घ्या : डॉ महेश गायकवाड , पर्यावरण तज्ञ, बारामती.

5 जून जागतिक पर्यावरण व विचार.

जागतिक पर्यावरण समजून घ्या : डॉ महेश गायकवाड , पर्यावरण तज्ञ, बारामती.

5 जून जागतिक पर्यावरण व विचार.

बारामती:वार्तापत्रक जागतिक पर्यावरण ही बाब सर्व मानव जातीने समजून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण तज्ञ डॉ महेश गायकवाड यांनी केले. जागतिक पर्यावरण दिन 5 जून निमित्त बोलत होते.
युनायटेड नेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने सन २०११ ते २०२० हे जैवविविधता दशक म्हणून साजरे करण्यात यावे तर २०२१ ते २०३० हे इकोसिस्टीम मजबुतीकरणासाठी जगाने एकत्रितपणे काम करण्याचे आव्हान जगासमोर मांडले आहे. यावर्षी आपण जैवाविविधतेचा प्रसार व प्रचार यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जनजागृती करणार आहोत. जगाच्या पातळीवर विचारमंथन करावे तर स्थानिक पातळीवर कृती करावी हा संदेश आपण सर्वजन विसरून चाललो आहोत. आता जगाला युद्धाची नव्हे तर गौतम बुद्धांच्या विचाराची गरज असल्याचे या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मला नमूद करावेशे वाटते. कारण आता जे समोर दिसत नाही अश्या विषाणू व जीवाणूशी आपले युद्ध सुरु असून यातून फक्त आपल्या जीवनशैलीत बदल करणे अत्यावश्यक आहे. अगदी महात्मा गांधींच्या विचारांची नितांत गरज असून, हा विचार म्हणजे पृथ्वी माणसाची गरज भागवू शकते मात्र हाव नाही, हा विचार यापुढील जीवनात आमलात आणलाच पाहिजे अशी आजची पृथ्वीवर जगणाऱ्या भटक्या मानवाची अवस्था आहे. आता कोरोना पूर्वीचे जग विसरून, कोरोना नंतरचे जग फक्त जगायला अनुकूल असेल हाव किंवा निसर्गाची लुट करण्यासाठी नसेलच. नैसर्गिक अधिवास नष्ट झाले तर प्राण्याकडून माणसाकडे अनेक साथीचे आजार येणार, आजपर्यंत अत्यंत बलवान असलेली मानवजात आता इतिहासजमा झालेली आहे. याला कारण आजची आपली चंगळवादी जीवनशैली, अगदी अमेरिका किंवा युरोपीय देश तर जगायला हि लायक राहिले नाहीत हेच कोरोना सारख्या महामारीने दाखवून दिले आहे. अगदी न्यूयॉर्क व इटली सारखी शहर कोरोना मुळे जगात सर्वाधिक बाधित झालेली आहेत, खरतर इथला विकास कारणीभूत असल्याची चर्चा सुद्धा नाही हे नवल, इथल्या लोकांनी सूर्य तरी पहिला आहे की नाही अशी चर्चा सुद्धा वाचायला मिळाली, शिवाय इथल्या लोकांनी सूर्यप्रकाश घ्यावा यासाठी जगान सांगावं लागत, ही तर लाजिरवाणी बाबच नव्हे काय? इथं एवढे चैनविलासी आहेत की यांच्या प्रमाणे फक्त जगात 160कोटीच माणस जगू शकतील, याचा अर्थ बेसुमार पणे निसर्गाची लूट करणारी ही लोक, यांचा काय आदर्श घेणार आपण, उलट आपल्या गरीब खेड्यातील लोकांचा आदर्श यांनी घ्यावा, अगदी कातकरी लोकांचा, तसेच आपलीच महाराष्ट्र राज्यातील दोन शहरे मुंबई आणि पुणे सर्वाधिक बाधित आहेत. याचा दोष मी शासन व्यवस्थेला देणार नाही मात्र या दोन शहरात प्रदूषण, वाढती झोपडपट्टी, इमारती रस्ते, जंगलतोड, नैसर्गिक अधिवास नष्ट करणे, डोंगरफोड करणाऱ्या सर्वच मानवी व्यवस्थेला देणे गरजेचे आहे. या दोन शहरात पर्यावरण व निसर्गाचे तीन तेरा कधीच वाजले आहेत, हे आपण विसरून गेलो कि काय? याकडे कानाडोळा करणारी चंगळवादी, उद्योगपती, कारखानदार यात भरीसभर म्हणून पर्यावरणवादि, समाजसुधारक टोळी बोलूच शकत नाही, कारन या सगळ्यांची संपत्ती पहिली तर सामान्य माणसाला घाम फुटेल. निसर्गाला लुटल्याशिवाय मानवाला संपत्ती गोळा करत येतच नाही. आजपर्यंत फक्त मला काय मिळेल यावृत्तीने काम करणारी राज्यातील व देशातील कारखानदार, उद्योगपती, राजकारणी यांनी स्व संपत्ती वाढविणे यापलीकडे काहीच केले नाही. प्रदूषण रोखणारी व्यवस्था असताना नद्या व ओढे मेलेच कसे? अहो यांची संपत्तीच दाखवते कि किती प्रदूषण झाले आहे नदी व ओढ्यात. आज जवळपास ९० टक्के पेक्षा जास्त नद्या व ओढे प्रदूषित झालेत कसे, फक्त स्वसंपत्ती मध्ये वाढ करायची म्हणून बर का !
पर्यावरण दिनाच्या निमिताने सांगावे वाटते कि, एक पूर्ण विभाग जंगल संरक्षण करणेसाठी सतत काम करत आहे, मात्र एवढे काम करूनही जंगल दरवर्षी नष्ट होण्याचा वेग वाढतोय, हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच नव्हे का?.
असो कोविड १९ या विषाणूने जगभर थैमान घातले असून आता अनेक विषाणू येतील अशी सूचना जगभरातील शास्त्रज्ञ देत आहेत. आता मात्र जगभरात नैसर्गिक अधिवास झपाट्याने नष्ट होत आहेत, याचा तात्काळ परिणाम फक्त इतर जीवांवर होईल मात्र गंभीर परिणाम मानवी जीवनावर होणार आहेतच, हे मात्र १०० टक्के खरे ठरत असून आता तरी आपण सावध भूमिका घेणार आहोत का नाही यावर आपले पुढील भविष्य निर्भर असेल, अशी सर्व शास्त्रज्ञांनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. अर्थात गेली अनेक वर्षापासून हे सांगतायेत मात्र विकासाच्या गर्तेत अडकलेले राजकारणी आणि श्रीमंतीच्या नशेत मधुधुंद झालेले लोक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. मात्र याची किंमत जगातील सर्व मानवजातीला चुकवावी लागेल. पृथ्वीवरील नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यामुळे त्यातील असंख्य जीव बेघर होत आहेत, यातील बहुसंख्य जीव आपले अधिवास सोडून जाताना दुसर्या अधिवासात असणार्या जीवांशी होणाऱ्या संघर्षात अनेक विषाणू व जीवाणू दुसर्या प्राण्यात प्रवेश करीत आहेत. या प्रकियेत अगदी १० साथीच्या रोगातील ६ रोग तर या प्रक्रियेत माणसापर्यंत अगदी सहजपणे येत आहेत. हि जीवघेणी प्रक्रिया अत्यंत वेगाने पसरत असून आता जर मानवाने आपल्या जीवनशैलीत बदल केला नाही तर निसर्ग आपल्याला माफ करणार नाही, किंबहुना नैसर्गिक अधिवास नष्ट करण्याचा वेग मानवाने थांबविला पाहिजे, अन्यथा मानवजात अत्यंत वेगाने नष्ट होईल. अगदी शेतीसाठी जंगलावर अतिक्रमण, वाढते शहारीकरण, मोठे रोड, वन्यजीवांचे व्यापार, तसेच वन्यजीवांचे निवारा, अन्न, पाणी शोधात भटकंती आणि त्यामध्ये त्यांच्या शरीरातील विषाणू व जिवाणूंचे माणसामध्ये होणारा प्रसार आणि मग कोरोना सारखी महामारी.
खरतर चीम्पंजी मधून एड्स व वटवाघळामुळे एबोलाचा विषाणू हा आफ्रिका मधील जंगलतोड व जंगलातील मानवी हस्तक्षेपामुळे माणसात आला, तर कोविड १९ हा जागतिक परिणाम हा नैसर्गिक अधिवास ऱ्हास होणे आणि जागतिकीकरण असा आहे. रमेश धीमन, मलेरिया संशोधन केंद्र दिल्लीचे शास्त्रज्ञ म्हणतात, भारत हा देश तर जैवविविधता प्रधान देश आहे. यामुळे आपल्या भागात अनेक प्रकारची नैसर्गिक जंगले व वन्यजीव आहेत. हि खूप आनंद व समाधान देणारी बाब आहे. मात्र जसजसे हे विविध प्राण्यांचे अधिवास नष्ट होऊन सर्वात जास्त साथीचे रोग भारतात तयार होत राहतील. परिणाम अनेक रोगांचे निदान सुद्धा आपल्याकडे होत नाही हे विशेष. शिवाय आपल्याकडे गवताळ भाग जास्त असल्यामुळे गवताळ भागातील अनेक उंदीर, चिचुंदऱ्या, घुशी यांचे माहेरघरच असते गवताळ भाग. मात्र अत्यंत वेगाने अशी गवताळ माळराने नष्ट होत असून परिणाम अनेक साथीचे रोग आपल्याकडे येत आहेत. यात अनेक विषाणू व लहान जीव जसे अनेक उवा सारखे जीव माणसात यायला लागले आहेत. अहो डेंगी, चिकन गुनिया, गोचीड ताप आपल्याकडे थैमान घातले आहे, अगदी सहजपणे लाखो मानस मरायला लागली आहेत, मात्र आजही आपण विकासाच्या गर्तेत गर्क आहोत. हे रोखायचे असल्यास आपल्याला नैसर्गिक गवताळ माळराने वाचवायला पाहिजेत. अहो अगदी गेल्यावर्षी निपाह सारखा विषाणू वटवाघळामुळे माणसात आला, मात्र शिमोगा- कर्नाटका परिसरात जंगलतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे, परिणाम जंगलातील फळ खाणारी वटवाघळ शेतीकडे किंवा फळबागाकडे आली आणि परिणाम निपाह. अगदी स्वाइंन फ्लू सारखा आजार डुकरामध्ये सामान्यतः त्रासदायक नसतो, मात्र तोच माणसामध्ये आला तर जीवघेणा ठरतो. जर नैसर्गिक अधिवास मजबूत असतील तर सर्व विषाणू व जीवाणू त्याच अधिवासात शांतपणे जगतात, शिवाय एकाच प्रजातीमधून पुढे पुढे प्रवास अतिशय शांतपणे सुरु असतो, मात्र अधिवास कुमकुवत झाले कि मग हा प्रवास खंडित होऊन हे विषाणू व जीवाणू दुसर्या प्रजातीच्या शरीरात प्रवेश करतात आणि मग विनाश होतो. निपाह व हेन्द्रा हे विषाणू प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगलतोड, याचा परिणाम वटवाघळाची वस्तीस्थाने व खाद्याची झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेली आणि मग फलहारी वटवाघळाना आपला मोर्चा मानवी वसाहतीमधील फळ झाडाकड वळवाव लागला. परिणाम मानव व वटवाघळ संबध वाढत चालले आहेत. हि बाब सुद्धा धोकादायक असल्याचे नमूद करावेसे वाटते.
खरतर जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवासातील बदल करणे मानव जातीला अतिशय धोकादायक ठरणार आहे, कारण पूर्वीपासून असणारे वन्यजीव अश्या जंगलात राहत असतात. मात्र आपण हे अधिवास नष्ट केले तर त्यातील वन्यजीव आपली जागा सोडतात, शिवाय काही नवीन जीव त्या जागेत येतात याचा परिणाम अतिशय वाईट होत असतो. कारण मूळ अधिवासात असणारे प्राणी हळूहळू नष्ट होत असतात आणि मग त्यांच्यावरील असणार्या विषाणू व जीवाणूं यांचे जगण्यासाठी दुसर्या जीवांच्या शरीरात प्रवेश मिळविण्यासाठी धडपड सुरु होते आणि मग नवीन वन्यजीवात प्रवेश केला कि मग सुरुवात होते, अतिशय वेगाने वाढून सर्वच त्या जातीच्या शरीरात प्रवेश करण्याची. हाच नियम आज कोरोना विषाणूने मानव जातीवर करायला सुरुवात केली आहे. चीनमधील यांग्स्ते नदीवर अगदी नव्याने बांधलेले थ्री गोर्जेस धरण जगातील सर्वात मोठे आहे. यामध्ये करोडो वन्यजीव बेघर झालेत आणि नष्ट झालेत. लाखो एकरावरील अधिवास नष्ट झाले. फक्त वटवाघळ उडू शकतात म्हणून वाचलीत मात्र त्याविषयी अजूनही अभ्यास सुरु आहे कि नक्की कोरोना आला कुठून. वूहान मार्केटबद्दल बोलले जाते मात्र याविषयी कोणीही चर्चा करीत नाही, हे विशेष. गीलीस्पे शास्त्रज्ञ म्हणतात कि, अनेक विषाणू प्रसार होण्यात, शेतीसाठी केलेली जंगलतोड करून एकसुरी पद्धतीने केलेली शेती सुद्धा महत्वाचे कारण आहे. यात पामतेलासाठी केलेल्या शेती मुळे निपाह व लासा विषाणू तर उस व सोयाबीन मुळे हन्त्या व्हायरस येत आहे. यात निफाह व्हायरस इंडोनेशिया मधील शेकडो एकरावर डुक्कर पालन व्यवसाय असून यात शेकडो एकरावर जंगले नष्ट केली. शिवाय जंगल जाळली गेली परिणाम फलहारी वाघळ शहराकडे वळली अगदी खूप लांबवर स्थलांतर झाले आणि परिणाम डुकरांना खायला दिले जाणारी झाडाची फळे, यात वटवाघळाची उष्टी फळे आली आणि ती डुकरांच्या खाण्यात आली, परिणाम डुकरांना हा ताप येऊ लागला, मात्र डुकरांना हा निपाह त्रासदायक नसून तो माणसात आला कि, त्रासदायक. निपाह झालेल्या डुकरांना खाणार्या माणसात आला. मग तो केरळ पर्यंत येऊन थांबला.
भविष्यात काय करावे लागेल हे महत्वाचे, पर्यावरण शिक्षण प्रकल्प भविष्यातील मानवी अस्तित्वाची गरज, कारण पर्यावरण शिक्षण म्हणजे निसर्ग शिक्षण ज्यातून आपणाला आपल्या परिसरातील पर्यावरण आणि
निसर्ग याचं नात अतूट असल्याच दिसून येत. आजकाल आपल्या शालेय जीवनात मात्र हा विषय शिकविला जात नाही आणि याचा परिणाम म्हणजे निसर्गाच आणि आपल नव्या पिढीच नात तुटत चालले आहे. पर्यावरण विषय हा सक्तीचा करून याविषयाचे तज्ञ विषय शिक्षक नेमून हा विषय शिकवीने गरजेचे आहे. हा विषय शिकविताना मुलांना निसर्गात घेऊन गेल पाहिजे आणि निसर्गाशी हितगुज करणे महत्वाचे असेल. निसर्गाशी हितगुज केली तरच मुलांना निसर्गातील विविध सजीव आणि निर्जींव यांचे अविष्कार समजतील, अर्थात आपल्या परिसराची स्थानिक जैववीविधाता मुलांना लहान वयातच कळणे गरजेचे आहे. मुलांना लहानपणीच निसर्गात, डोंगरावर, नदीकाठी, तलावाकाठी, जुनी मंदिरे, अभयारण्ये, घनदाट जंगले, माळराने, समुद्र किनारे, विवध पर्वतावर घेऊन गेल पाहिजे तरच मुलाना निसर्ग आणि त्याच पवित्र कळेल आणि यांचा परिणाम म्हणजे निसर्गाशी त्याचं नात घट्ट होऊन निसर्ग संवर्धन होईल. निसर्ग वाचायला शिकविले तरच नवीन पिढी निसर्ग वाचवायला शिकेल हे एकमेव सत्य असून याशिवाय कोणताही उपाय पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक पातळीवर होऊ शकत नाही, म्हणून लहानपणी मुलांचा पर्यावरणीय बुद्धांक वाढविणे आवश्यक आहे.
शिवाय आपल्या भोवती असणारी जैवविविधता संरक्षण म्हणजे काय असते हे समजून घेणे अत्यावश्यक आहे, नाहीतर पर्यावरण संरक्षनाच्या नावाखाली आपणच जैवविविधता नष्ट करत राहू. यासाठी पहिले काम म्हणजे आपण आपल्या घराभोवती, शेतीच्या बांधावर, गावाशेजारी, शहराजवळ, जंगलात किंवा कुठेही झाड, गवत, झुडपे, वेली, फुलझाड, फळझाड, भाजीपाला, पीक लावताना स्थानिक बाबींचा विचार करावा लागेल. वृक्षारोपण करताना फक्त स्थानिक झाडांचाच विचार करावा लागेल तरच आपण स्थानिक जैवविविधता वाचेल. मात्र परदेशी गवत, झुडप, झाड, वेली यांची लागवड केली तर आपल्याला विषाणू व जीवाणू सोडणार नाहीत. वेळीच सावध भूमिका घेऊन आपण आता एकच चांगले काम करू शकतो ते म्हणजे स्थानिक हिरवळ वाढविणे. आपल्या शेतात बांधावर काटेरी झाड ठेवली पाहिजेत. एकसुरी पिक न करता, किमान चार प्रकारची पोके केली पाहिजेत, त्यात एकदल व द्विदलवर्गीय पिक केली पाहिजेत, जस हरभरा व ज्वारी.
आपल्या घराभोवती असणारी छोटी पाणथळ, गावाभोवती असणारे ओढे, येळ, बारव, पाणवठे, नदी वाचविले पाहिजेत. नदीच्या पात्रात कधीही निर्माल्य टाकू नये हे सांगाव लागते हीच शोकांतिका आहे. नदी म्हणजे कचराकुंडी नव्हे हे जगाला ओरडून सांगायला हवे. नाहीतर पुढील पिढी नदी म्हणजे मोठे गटार समजेल. थोर निसर्गतज्ञ मारुती चित्तमपल्ली सांगतात कि, नदी ओढे, दगड, माती, वाळू, झाड, पर्वत, डोंगर या प्रत्येकाला देव मानल पाहिजे आणि त्याची पूजा केली तरच आपण हे सगळ स्थानिक जैववैविध्य वाचवू नाहीतर विनाश अटळ आहे. आपल्या अवतीभवती असणारी फुलपाखर, मधमाश्या, पक्षी, वन्यजीव याचे संरक्षण केले पाहिजे, शिकार थांबविली पाहिजे. अहो हीच तर आहे स्थानिक जैवविविधता, जिच संरक्षण करणे नितांत गरजेचे आहे. वटवाघळे बदनाम करणारी मीडिया मधील काही अडाणी मंडळी तर त्यांच्या अकलेचे तारे तोडत अनेक वन्यजीवांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात भारतीय वटवाघळे दोषी नसताना वारंवार कोरोना वाघळामूळे येत असल्याचे सांगितले परिणाम लोकांनी हजारो वटवाघळे मारली अनेक फलहारी झाडे तोडली, दोष कुणाचा तर चुकीच्या पद्धतीने बातम्या देणारांचा च. मात्र जीव जातोय बिचार्या वन्यजीवांचा. प्रत्येकाने ठरविले पाहिजे कि, यापुढील आपला जीवन प्रवास फक्त नैसर्गिक अधिवास संरक्षण करण्याचा म्हणजे स्थानिक जैवविविधता जोपासनाच्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!