मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू
राज्य सरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू
राज्य सरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई :प्रतिनिधी
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली.समाजाला वेठीस धरू नये म्हणून मी एकट्यानं आंदोलन करायचा निर्णय घेतला आहे. मला सपोर्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना पाठिंबा असं खासदार संभाजीराजे म्हणाले.
17 जूनला राज्य सरकार सोबत चर्चा केली होती. पंधरा दिवसात राज्य सरकार कडील सर्व मागण्या मार्गी लावू असे आश्वासन त्यावेळी देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्याच मागण्या घेऊन उपोषणाला बसावे लागत आहे अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. उपोषण सुरू करण्याआधी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील वातावरण बदललं
2013 पासून मराठा आरक्षणासाठी लढत असणाऱ्या सर्व संघटना एकत्र आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व आपण करावे अशी विनंती या संघटनांकडून करण्यात आली असल्याचं यावेळी छत्रपतींनी सांगितले. आपण केवळ मराठा समाजाचेच नाही तर, बारा बलुतेदार, अठरापगड जातींचे प्रतिनिधित्व करत आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण उपोषण करणार आहोत असे समजतात गेल्या दहा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बदललं असल्याच यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
राज्य सरकारकडे केलेला मागण्या अगदी छोट्या
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने काही सुविधा मराठा समाजाला देण्यात यावा यासाठी मागण्या करण्यात आल्या होत्या. अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मराठा समाजातील शेकडो तरुणांना रोजगार मिळू शकतो. मात्र अद्याप त्याबाबत राज्य सरकारने काहीही केले नाही. तसेच सारथी संस्थेसाठी पुणे आणि कोल्हापूर येथे राज्य सरकारने पावले उचलली असली तरी, अद्याप त्या संस्थेवर संचालक नाहीत. मूलभूत सुविधा देखील मिळत नाही. मराठा समाजातील आंदोलकांवर असलेले गुन्हे देखील अद्याप मागे घेतले गेले नाहीत. एमपीएससीमधील मराठा समाजातील तरुणांचा प्रश्न अद्यापही तसाच आहे. कोपर्डी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात गुन्हेगार गेले आहेत. मात्र त्यातही राज्य सरकारकडून काय हालचाली केल्या गेल्या नाहीत. अशा काही मागण्यांचा पाढा यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत वाचला. या मागण्या राज्य सरकारला सहज पूर्ण करणे शक्य आहे. मात्र यातही राज्य सरकार गंभीर नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
ठाकरे सरकारला सवाल
मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय झाला.
यावरुन संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला एक सवाल केला आहे. संभाजीराजे म्हणाले, माझा कायदेशीर अभ्यास तसा झालेला नाहीये पण मला असं वाटतं एक मागासवर्ग आयोग असताना तुम्ही स्पेशल मराठा समाजासाठी एक वेगळा आयोग तयार करता येतो का? हा प्रश्न आहे. कायदेशीर सल्ला याबाबत घेणं आवश्यक आहे. केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठी असं स्टेटमेंट यायला नको. माझ्या माहितीप्रमाणे एखादा आयोग नेमला असतो तेव्हा दुसरा आयोग तेथे स्थापण करणं हे कायद्यात, घटनेत कुठेही लिहिलेलं दिसत नाही.