मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करावे; संभाजी ब्रिगेडची मागणी
संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्य शासनाच्या या भूमीकांचा जाहीर निषेध केला

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करावे; संभाजी ब्रिगेडची मागणी
संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्य शासनाच्या या भूमीकांचा जाहीर निषेध केला
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस.इ.बी.सी वर्गातील आरक्षण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हा निकाल अतिशय दुर्दैवी व मराठा समाजावर सर्वार्थाने अन्याय करणारा आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत वेळोवेळी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्य शासनाच्या या भूमीकांचा जाहीर निषेध केला आहे. केंद्र सरकारने विशेष घटना दुरुस्तीच्या माध्यमातून राज्यघटनेत नवे ३४२ (अ) कलम आणले आणि एस.ई.बी.सी हा नवीन प्रवर्ग निर्माण केला आहे. तांत्रिक व कायदेशीर अंगाने विचार केला, तर कलम ३४० अंतर्गत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यात व ३४२ (अ) यामध्ये फरक दिसून येत नाही. या कारणांमुळेच सुरुवातीपासूनच मराठा समाजाला संवैधानिक व सगळीकडे टिकणारे कायदेशीर सरसकट ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करीत आहे. आणि ते त्वरीत सरकारने करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन बारामती येथील उपविभागीय अधिकारी मा.दादासो कांबळे यांच्यामार्फत देण्यात आले.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पासलकर, पुणे जिल्हा सचिव विनोद जगताप, बारामती तालुकाध्यक्ष तुषार तुपे, दौंड तालुकाध्यक्ष कुलदीप गाढवे, इंदापूर तालुकाध्यक्ष मकरंद जगताप, पुरंदर तालुकाध्यक्ष संदीप बनकर, पुणे जिल्हा कार्यध्यक्ष रमेश चव्हाण, जिल्हा संघटक सचिन अनपट, बारामती शहराध्यक्ष अजित भोसले, जिल्हा कृषी आघाडी अध्यक्ष कांतीलाल काळकुटे, बारामती तालुका संघटक रणजित जगताप, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमर फुके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.