इंदापूर

मर्कटलीला विसरून माकडाला लागलाय माणसाचा लळा

माणसांळलेल्या माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मर्कटलीला विसरून माकडाला लागलाय माणसाचा लळा

माणसांळलेल्या माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

इंदापूर : प्रतिनिधी
वेगवेगळ्या करामती करण्यात माकड पौराणिक काळापासून प्रसिद्ध आहे.आपण नेहमीच मंदिरांची शिखरे,गर्ध झाडीच्या ठिकाणी त्यांच्या मर्कटलीला पहात असतो.टोपीवाल्याच्या गोष्टीत सतवणारी माकडे आपण ऐकली आहेत.परंतु इंदापुरात मात्र याच माकडाचा वेगळाच प्रत्यय आल्याचे पहावयास मिळत आहे.

इंदापूर शहरातील सावतामाळी नगर परिसरातील संजय सोरटे या शिक्षकाच्या घरी एक वानर दररोजचाच पाहुणा बनून येजा करताना पहावयास मिळत असून शिक्षक संजय सोरटे त्या वानराला आपल्या लहान मुलांप्रमाणे दररोज भुईमुगाच्या शेंगा,केळी बरोबरच त्याच्या आवडते खाद्यपदार्थ तसेच पाणी आपल्या हाताने भरवतात.वानर देखील त्यांच्यावर हल्ला न करता हे सर्व खाऊन पिऊन पुन्हा झाडावरती स्वच्छंदीपणे बागडताना दिसत आहे.

अशा मर्कटलीला विसरून माणसांळलेल्या माकडाची चर्चा परिसरात असून सोरटे सरांचा व वानराचा हा व्हिडिओ ग्रामीण भागात व्हायरल होताना पहावयास मिळत आहे.

Related Articles

Back to top button