मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं आज कोरोनाने निधन
बद्दल आणि तब्बल 70 वर्षे तमाशा कला क्षेत्रात मोठं योगदान दिल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं आज कोरोनाने निधन
बद्दल आणि तब्बल 70 वर्षे तमाशा कला क्षेत्रात मोठं योगदान दिल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ वगसम्राज्ञी, मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं आज कोरोनाने निधन झालं. त्या 82 वर्षाच्या होत्या. त्या प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या. कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कांताबाई सातारकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर संगमनेर येथे गेल्या काही दिवसांपासून उपचारही सुरू होते. मात्र, वयोमानामुळे त्यांची प्रकृती दिवसे न् दिवस खालावत होती. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आजच अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.
गाजलेली वगनाट्य
रायगडची राणी
गवळ्याची रंभा
गोविंदा गोपाळा
1857 चा दरोडा
तडा गेलेला घडा
अधुरे माझे स्वप्न राहिले
कलंकिता मी धन्य झाले
असे पुढारी आमचे वैरी
डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी
कोंढाण्यावर स्वारी
पाच तोफांची सलामी
महारथी कर्ण
हरिश्चंद्र तारामती
जय विजय