
टेक्निकल मध्ये मराठी दिन उत्साहात साजरा
सर्व मराठी भाषा विषयी शिक्षक उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयांमध्ये मराठी दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकार यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री कल्याण देवडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व मराठी भाषा विषयी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी मधील कुमारी तनिष्का माने व कुमारी नीलम गरगडे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुमारी शर्वरी झणझणे या विद्यार्थिनींनी केले.
मराठी भाषा दिनाविषयी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली, यामध्ये कुमारी राधिका घोरपडे हीने मराठी दिनाची सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी कविता गायन, स्वरचित काव्य गायन, पोवाडा गायन ,अभंग गायन तसेच विद्यार्थ्यांना मराठी दिनाविषयीची प्रश्नमंजुषा सादर करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ स्मिता निंबाळकर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगून कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे गायन केले.
यावेळी जेष्ठ शिक्षिका सौ. जयश्री हिवरकर, अर्चना पेटकर, मनीषा रुपनवर, श्रीमती सुजाता गाडेकर, गुरुकुल प्रमुख श्री अरविंद मोहिते व इतर अनेक शिक्षक उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आभार कुमारी तनिष्क माने हिने मानले.