इंदापूर मध्ये गटारी जोरात : मासे,मटण खरेदीसाठी मांसाहार प्रेमींची तोबा गर्दी
परिसरातील हॉटेल-धाब्यांवर देखील ग्राहकांची गर्दी

इंदापूर मध्ये गटारी जोरात : मासे,मटण खरेदीसाठी मांसाहार प्रेमींची तोबा गर्दी
परिसरातील हॉटेल-धाब्यांवर देखील ग्राहकांची गर्दी
इंदापूर : प्रतिनिधी
गटारी अमावस्या असल्याने रविवारी ( दि.८) सकाळपासूनच इंदापूर मधील मटण दुकानांसह मासळी बाजारात मांसाहार प्रेमींनी गर्दी केली होती. श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात.त्यामुळे अनेकांनी आखाड पार्टीचे आयोजन करून मांसाहारावर ताव मारला.
सोमवारी ( दि.९ ) श्रावण सुरू होणार आहे.श्रावण महिना अनेकांसाठी शाकाहारी महिना असतो.श्रावण महिना संपल्या नंतर ही लगेचच अनेक नागरिक गणपती विसर्जन होईपर्यंत मांसाहार करणे वर्ज्य करतात.त्यामुळे जवळपास दीड महिने उलटल्यानंतरच मांसाहार प्रेमींना मांसाहार करण्याची संधी मिळते.त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी गटारी अमावस्या मटण,चिकन,मासे खाऊन साजरी करण्यात येते.
सोमवारी श्रावण चालू होणार असल्याने रविवारी ( दि.८) इंदापूर मासळी बाजारात मोठ्या प्रमाणात मासळीची आवक होती.त्यामुळे इंदापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत मासळी खरेदी केली.त्याबरोबरच इंदापूरातील बाजारपेठेतील मटण,चिकन दुकानात ही रांगा लागल्याच्या पहावयास मिळाले.