महामंडळाचे भाग भांडवलात वाढ केलेने, हराळे वैष्णव समाज संघाच्या वतीने; राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा बारामतीत सत्कार
महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.
महामंडळाचे भाग भांडवलात वाढ केलेने, हराळे वैष्णव समाज संघाच्या वतीने; राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा बारामतीत सत्कार
महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.
बारामती वार्तापत्र
दि.28 एप्रिल 2022 रोजी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे 73.21 कोटी भाग भांडवलावरून 1 हजार कोटी भाग भांडवल केलेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा बारामतीत हराळे वैष्णव समाज संघ बारामतीच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. या महामंडळाचा महाविकास आघाडीने विचार करीत जो भाग भांडवल वाढविण्याचा निर्णय घेतला तो संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.
यावेळी हराळे वैष्णव समाजसंघाचे अध्यक्ष नितीन सुभाष आगवणे, उपाध्यक्ष पंढरिनाथ कांबळे, सचिव नागेश लोंढे , सदस्य भाऊसाहेब कांबळे , हनुमंत माने ,योगेश दुर्गे , दिपक सोनवणे , हनुमंत भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.