महाराष्ट्राचा सुपर हेवीवेट पैलवान अभिजीत कटके ,महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळणार नाही
महाराष्ट्र केसरीचा मान त्याला मिळला होता.
महाराष्ट्राचा सुपर हेवीवेट पैलवान अभिजीत कटके ,महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळणार नाही
महाराष्ट्र केसरीचा मान त्याला मिळला होता.
मुंबई :प्रतिनिधी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा या ठिकाणी होत आहे या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके खेळणार नसल्याचं त्यांनी जाहीर केले . यंदा अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी खेळणार नाही. दोन वेळा उप महाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी असणारा पैलवान यंदा आखाड्यात उतरणार नाही.
2017 साली भूगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटके याने महाराष्ट्र केसरीची गदा किरण भगतला पराभूत करुन जिंकली होती.
महाराष्ट्र केसरीचा मान त्याला मिळला होता. 2018 साली जालना येथे झालेल्या स्पर्धेत बालारफीक शेखने अभिजीत कटकेचा अंतिम सामन्यात केला होता पराभव.
अभिजीत कटके नक्की कोण आहे याची माहिती जाणून घेऊ या.
अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे.अभिजीतचं वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे. अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीतला गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण जमखिंडीतल्या भारत केसरी या खिताबानं त्याच्यात नवा जोश भरला.
वयाच्या बाविशीतही अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता.