शैक्षणिक

महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी आणि 12वी च्या लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय कमी

महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी आणि 12वी च्या लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय कमी

पुणे – प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्यावतीने ( State Board Exam Date ) घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वी च्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल ( 12th class Exam Date ) या कालावधीत होणार असून इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल ( 10th Class Exam Date ) या कालावधीत होणार आहे. जे काही ओरल आणि प्रॅक्टिकलच्या परीक्षा होणार आहे, हे त्या-त्या विभागीय मंडळाच्यावतीने देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

यंदा आर्ध्या तास आधी परीक्षा –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय कमी झाल्याने यंदा होणाऱ्या सकाळच्या सत्रातील लेखी परीक्षा ही आर्ध्यातास आधी होणार आहे, असे देखील यावेळी गोसावी म्हणाल्या.

यंदा ऑफलाइन पद्धतीने होणार परीक्षा –

इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांच वेळापत्रक आज बोर्डाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्याच पद्धतीने 75 टक्के अभ्यासक्रमावर ही परीक्षा होणार आहे. कोविडच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव हा कमी झाला आहे. त्यामुळे 80, 90 आणि 100 टक्के मार्कच्या ज्या परीक्षा होणार आहेत, त्या परीक्षांना अर्धा तास आधी वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 50, 60 आणि 70 टक्के मार्कांच्या ज्या परीक्षा होणार आहे, त्याला 15 मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे, असे गोसावी म्हणाले. तसेच आजपर्यंत बारावीच्या परीक्षेसाठी 1426980 विद्यार्थ्यांची, तर दहावीसाठी 1527762 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.

असं असेल परीक्षेचं वेळापत्रक –

  • 12 वी रेग्युलर परीक्षा
तारीख विषय वेळ
4 मार्च इंग्रजी सकाळी 10.30 ते 2
5 मार्च हिंदी सकाळी 10:30 ते 2
6 मार्च जर्मन

जपानी

चिनी

दुपारी 3:30 ते 6:30
7 मार्च मराठी सकाळी 10:30 ते 2
उर्दू दुपारी 3:00 ते 6:30
8 मार्च महाराष्ट्र प्राकृत संस्कृत सकाळी 10:30 ते 2
रशियन,अरेबिक दुपारी 3:00 ते 6:30
9 मार्च वाणिज्य संघटन व व्यवस्थापन सकाळी 10:30 ते 2
10 मार्च तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र सकाळी 10:30 ते 2
11 मार्च चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन सकाळी 10:30 ते 2
12 मार्च रसायनशास्त्र सकाळी 10:30 ते 2
राज्यशास्त्र दुपारी 3:00 ते 6:30
14 मार्च गणित आणि संख्याशास्त्र सकाळी 10:30 ते 2
तालवाद्य दुपारी 3:00 ते 6:30
15 मार्च बालविकास

कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान

पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान

सकाळी 10:30 ते 2
16 मार्च सहकार सकाळी 10:30 ते 2
17 मार्च जीवशास्त्र

भारतीय संगीताचा इतिहास व विकास

सकाळी 10:30 ते 2
19 मार्च भूशास्त्र सकाळी 10;30 ते 2
अर्थशास्त्र दुपारी 3:00 ते 6:30
21 मार्च वस्त्रशास्त्र सकाळी 10:30 ते 2
पुस्तपालन आणि लेखाकर्म दुपारी 3:00 ते 6:30
22 मार्च अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान सकाळी 10:30 ते 2
तत्वज्ञान दुपारी 3:00 ते 6:30
23 मार्च

(द्विलशी अभ्यासक्रम)

विद्युत परीक्षण,यांत्रिक परीक्षण सकाळी 10:30 ते 1 :15
तत्वज्ञान दुपारी 3 ते 6:30
23 मार्च वाणिज्य गट

कृषी गट

मत्स्य व्यवसाय गट

सकाळी 10:30 ते 2
24 मार्च मानसशास्त्र दुपारी 3 ते 6:30
25 मार्च व्यवसायिक

सर्वसाधारण स्थापत्य अभियांत्रिकी

वाणिज्य गट

कृषी गट

मसत्य व्यवसाय गट

सकाळी 10:30 ते 2
व्यवसायाभिमुख दुपारी 3 ते 6:30
26 मार्च भूगोल दुपारी 3 ते 6:30
28 मार्च इतिहास दुपारी 3 ते 6:30
29 मार्च संरक्षणशास्त्र दुपारी 3 ते 6:30
30 मार्च समाजशास्त्र दुपारी 3 ते 6:30

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!