महाराष्ट्रात नव्या वादाची ठिणगी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करा.
शिवधर्म फाउंडेशन ची मागणी. महाराष्ट्रात पंधरा जिल्ह्यात दिली निवेदनं .
महाराष्ट्रात नव्या वादाची ठिणगी,
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करा.
शिवधर्म फाउंडेशन ची मागणी.
महाराष्ट्रात पंधरा जिल्ह्यात दिली निवेदनं .
महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात गेली ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचं युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं आहे. या बिडीच्या बंडल वर महाराजांचे नावं.. फोटो देखील वापरले जात आहेत. तो कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे. हा अवमान सहन केला जाणार नाही. या साठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नावं बदलून निर्मिती करावे. अशी मागणी शासन दरबारी शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेऊन कारवाई न झाल्यास १ सप्टेंबर पासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने देण्यात आला आहे…