कोरोंना विशेष
महाराष्ट्रात पुन्हा चिंता वाढली, कोरोनाच्या संसर्गात गेल्या 24 तासांत 4 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद
पुन्हा लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध नको असतील तर मास्क वापरा.
महाराष्ट्रात पुन्हा चिंता वाढली, कोरोनाच्या संसर्गात गेल्या 24 तासांत 4 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद
पुन्हा लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध नको असतील तर मास्क वापरा.
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू आहे. ही मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे. आधीच्या दिवशी देशात 3712 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची दर 0.05 टक्के आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 लाख 25 हजाप 379 नमुने तपासण्यात आले आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
राज्यात पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य केला जाऊ शकतो, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.
कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंधाचा कालावधी सुरू होऊ शकतो. राज्यात पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य केला जाऊ शकतो, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनाची प्रकरणं वाढत राहिल्यास लोकांना मास्क वापरणं अनिवार्य करावं लागेल. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. कोरोना संसर्गाची संख्या अशीच वाढत राहिल्यास मास्कचा वापर अनिवार्य करावा लागू शकतो. कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक घेतली. टास्क फोर्सच्या सदस्यांच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांना पुन्हा बंदी नको असेल तर त्यांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. राज्यात पुन्हा लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध नको असतील तर मास्क वापरा.