महाराष्ट्र खते उत्पादक न्याय्य हक्क समितीची स्थापना
अध्यक्षपदी समित पवार तर खजिनदार पदी गोरुरा ऍग्रो चे अमोल राठोड

महाराष्ट्र खते उत्पादक न्याय्य हक्क समितीची स्थापना
अध्यक्षपदी समित पवार तर खजिनदार पदी गोरुरा ऍग्रो चे अमोल राठोड
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्यामधील सर्व खते उत्पादक एकत्र येऊन खते उत्पादनामध्ये होणारा काळा बाजार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी खते उत्पादक न्याय हक्क समिती ची स्थापना केली आहे. या समिती यांच्या अध्यक्षपदी सुमित पवार यांची तर उपाध्यक्षपदी मेघराज निकम, विनोद पवार यांची निवड झाली.
इतर कार्यकारिणीत सरचिटणीसपदी रवी नरसाळे यांची निवड झाली. चिटणीसपदी जयदीप पाटील, खजिनदारपदी अमोल राठोड. संपर्कप्रमुख राजेश मुखणे, सहसंपर्कप्रमुख शिवकुमार शिंदे, प्रवक्ता सुहास थोरवत, सहप्रवक्ता स्वप्निल सूर्यवंशी, व्यवस्था प्रमुख इरफान शेख आणि महाराष्ट्रातील विभागीय समितीवर पुणे विभागासाठी संदीप पाटील अध्यक्षपदी निवड झाली.
कोल्हापूर विभाग अध्यक्ष मदन अनुसे, नाशिक विभाग अध्यक्ष विक्रम दिसले, अमरावती विभाग अध्यक्ष पवन झोरे, संभाजीनगर अध्यक्षपदी योगेश ढोकळे यांची नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी खते उत्पादक न्याय हक्क समितीची स्थापना ७ फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्रातील कृषी खते व औषधे उत्पादक यांची बैठक घेऊन स्थापना करण्यात आली.
जे कृषी उत्पादक व्यवसायिक विनापरवाना व्यवसाय करत आहेत त्यांना आळा बसावा यासाठी करण्यात आलेली आहे. कृषी आयुक्त, कृषी मंत्रालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर वेळोवेळी बैठक घेऊन कृषी दुकानदार, कृषी व्यावसायिक आणि कृषी उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करू व महाराष्ट्र खते उत्पादक समितीमार्फत शेतकऱ्यांच्या, खते दुकानदाराच्या आणि खते उत्पादक कंपन्यांच्या कायमस्वरूपी हिताचे प्रयत्न केले जातील आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचा खतांचा पुरवठा होईल याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र खते उत्पादक न्याय हक्क समितीचे उपाध्यक्ष मेघराज निकम यांनी दिली आहे.
उपस्तितांचे आभार बारामती येथील गोरुरा ऍग्रो चे चेअरमन अमोल राठोड यांनी मानले.
चौकट:
शासनाच्या नियम व अटी नुसार काम करत असताना बनावट कंपन्या शेतकऱ्यांना फसवत आहेत त्यावर शासनाने आळा घालावा इमानदारीने काम करणाऱ्यांना न्याय मिळावा व संरक्षण मिळावे म्हणून संघटनेच्या वतीने प्रत्यन करू अमोल राठोड चेअरमन गोरुरा ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. एमआयडीसी, बारामती