स्थानिक

महाराष्ट्र दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्ववंदन करण्यात आले.

या ध्वजारोहण कार्यक्रमाला तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याजधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे, महसूल नायब तहसिलदार महादेव भोसले, निवडणूक नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, नायब तहसिलदार सुवर्णा ढवळे, डॉ. भक्ती सरोदे, उप अभियंता अमोल पवार यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक, सर्व विभागचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व विविध क्षेत्रातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर प्रशासकीय इमारतीच्या आवारातील सभागृहामध्ये महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त् तालुका प्रशासन व जेष्ठय स्वा.सैनिक स्व.डॉ.वर्धमान कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट, बारामती यांच्यावतीने ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक व त्यांचे कुटुंबिय, विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक साहिल कोठारी व सचिव शेखर कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button