स्थानिक
महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना
लिलावर्ध गुणवंत कर्मचारी पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना
लिलावर्ध गुणवंत कर्मचारी पुरस्काराचे वितरण
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापनदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी पंकज भुसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक,पत्रकार, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यक्रमानंतर श्री. नावडकर यांच्या हस्ते लिलावर्ध गुणवंत कर्मचारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.