स्थानिक

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनउन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या सयुक्ता विद्यमाने वार्षिक सभा संपन्न

ई-शासकीय सेवांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.,

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनउन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या सयुक्ता विद्यमाने वार्षिक सभा संपन्न

ई-शासकीय सेवांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.,

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनउन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या सयुक्ता विद्यमानाने पारदर्शक महिला प्रभागसंघ जि. प गट सांगवी -डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांची सनं 2025/26 ची वार्षिक सर्वसाधारण सभा 7/04/26 रोजी वीरशैवं मंगल कार्यालय बारामती येथे संपन्ना झाली.

सदरील सभेला प्रमुख पाहुणे किरण जी तावरे सभापती पंचायत समिती बारामती तसेच उप सभापती शुभांगी आगावणे तसेच गटविकास अधिकारी किशोर माने यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

सभापती यांनी महिलांना आरोग्य शिक्षण विमा ई. माहिती दिली. सभे मध्ये वार्षिक ताळेबंद चे वाचन करणेत आले व पुढील वर्षाचे नियोजन चे वाचन केले.

प्रभागसंघ चे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व बाबनिहाय सर्वानुमते सेवाशुल्क लागू करणे चे ठराव मंजूर करणेत आला. नविन कार्यकारिणी ची निवड करणेत आली. उद्योजक महिलांना आपले अनुभव कथन केले.

या कार्यक्रमात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), तसेच बीज भांडवल योजना आणि ई-शासकीय सेवांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली., ई शासकीय योजनाची माहिती देणेत आली.

सर्व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामसखी, बँक सखी. कृषी सखी, पशु सखी, प्रभागातील सर्व स्टाफ उपस्थिती होते.

Back to top button