महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद-प्रदीप गारटकर.
सरडेवाडी येथील गरीब कुटुंबांना मोफत किटचे वाटप...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद-प्रदीप गारटकर.
सरडेवाडी येथील गरीब कुटुंबांना मोफत किटचे वाटप…
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे (तालुका प्रतिनिधी)
गरीब उपेक्षित कुटुंबाला न्याय देण्याच्या हेतूने,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आत्तापर्यंत ८००० कुटुंबांना व जीवन उपयोगी वस्तू चे किट मोफत देऊन तसेच इंदापूर तालुक्यातील ५००० कलाकारांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा संकल्प हा पत्रकार संघाचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा,आदर्श असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने गरीब,गरजू व शेतमजूर कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर(मामा)भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथिल अथर्व मंगल कार्यालय प्रांगणात (गुरुवार ९ जुलै) रोजी पार पडला.
यावेळी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,जेष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे,उपाध्यक्ष संदीप सुतार,पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी,जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेशराव मिसाळ,भीमराव आरडे,सचिन खुरंगे, उदय जाधव देशमुख,शिवाजीआप्पा पवार,जावेद शेख, इम्तियाज मुलाणी,विजय शिंदे,प्रेस फोटोग्राफर स्वप्नील चव्हाण,राजू भोसले,शिवकुमार गुणवरे,युवक नेते राजाराम सागर,ग्रामपंचायत सदस्य सतीश चित्राव, पांडुरंग जाधव,रामदास पिंपरे,अतुल ढावरे,मोहन सरडे, हनुमंत चित्राव,सचिन शिरसाट,गोरख जाधव,एकनाथ सागर,प्रशांत सरडे तसेच गावचे ग्रामसेवक शहाजी कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.इंदापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.फिजिकल डिस्टनसींगचे तंतोतंत पालन करण्यांत आले.
यावेळी बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले की,समाजजीवनातील चक्र सुस्थितीत चालावे यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून लेखणी पत्रकार करतात. एवढ्यावरच न थांबता इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने सामान्य जनतेसाठी काम करण्याचा मानस ठेवला असल्याने सामाजिक कामात पत्रकार संघ अग्रेसर राहिला आहे.कोरोना चे संकट गावाच्या उंबर्यांपर्यत येऊन ठेपले असताना,नागरिकांनी बाहेर पडू नये स्वतःच्या कुटुंबाची काळजी खबरदारी घ्यावी म्हणून तालुक्यात राज्यात विक्रम झाला आहे. इतके अन्नधान्य व रक्तदान झाले आहे त्यामुळे सामाजिक जाणिवा जपणारा इंदापूर तालुका ठरला आहे.काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व भागात पत्रकार संघाच्या माध्यमातून वस्तूंचे किट मिळाल्याने गोरगरीब कुटूंबांना हातभार लाभला आहे अशीही माहिती गारटकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते म्हणाले की,खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेसाठी केलेले काम,आनंद देणारे असते.त्यामुळे तालुक्यातील पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखणीच्या सोबतीला सामाजिक कामाची साथ कायम असावी,म्हणून अनेक उपक्रम राबविण्याचे धोरण ठरवले आहे.त्यानुसार कामकाज सुरू आहे.तालुक्यातील कलाकार तसेच आपली उपजीविका कलेवर करून संसार चालवतात अशा नागरिकांना पत्रकार संघाच्या माध्यमातून मोफत कीट पुरवण्यात येणार असल्याची माहिती देखील तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे यावेळी कौतुक केले.
इंदापूर:तालुक्यातील सरडेवाडी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू चे किट मोफत वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे व मान्यवर.