महाविकास आघडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने धाड
दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
महाविकास आघडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने धाड
दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. शिवसेनेतील मोठं नाव म्हणजे, परिवहन मंत्री अनिल परब. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीनं धाड टाकली आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच, ईडीनं अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणावरुनही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. पण अनिल परब यांच्याशी संबंधित दापोली रिसॉर्ट प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परबांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने परबांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
ईडीच्या छाप्यांमागे सचिन वाझे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी वाझे यांच्या जबाबामध्ये अनिल परब यांचे नाव समोर आलं होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने ईडीने छापेमारी सुरू केली आहे.
पुण्यात ईडीची कारवाई
मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील अनिल परब यांच्या संबंधित व्यक्तींवर छापेमारी सुरु आहे. विभास साठे यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकलेत. पुण्याच्या कोथरूड भागात द पॅलाडियम आणि इंद्रधनू या इमारतीमध्ये छापेमारी सुरु आहे. या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. पुण्यातील याच निवासस्थानी पहाटेच ईडीचं पथक दाखल झाले आहे. विभास साठे यांचा इंद्रधनू अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये भाडेकरू राहतात. त्याठिकाणी भाडेकरुंकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.
अनिल परब यांच्या मुंबईतील निवासस्थानासह पुणे मुंबई आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीनेही कारवाई सुरु केली आहे. या पथकात जवळपास चार अधिकारी आहेत. अनिल परब यांच्याशी संबधीत चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक पुण्यातही पोहोचलं आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील दी पॅलेडियम या ठिकाणी 20 व्या मजल्यावर राहणारे विभास साठे यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.
यात 1 कोटी 10 लाखांचा व्यवहार झाला होता, असे समजते. एका व्यवहारात साठे यांना ब्लॅकमनी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. विभास साठे हे एक उद्योजक आहे. झालेल्या व्यवहारातील कागदपत्रांवर विभास साठे नावाने बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग केला आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.