महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले, सत्र न्यायालयाचा धक्का,मलिक, देशमुख मतदान करू शकणार नाहीत
राज्यसभा निवडणुकीला अवघी एक दिवसा राहिला आहे.
महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले, सत्र न्यायालयाचा धक्का,मलिक, देशमुख मतदान करू शकणार नाहीत
राज्यसभा निवडणुकीला अवघी एक दिवसा राहिला आहे.
मुंबई,प्रतिनिधी
राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वच पक्ष लहान पक्षांचे आमदार आणि अपक्षांना आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर नुकतीच मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत अनिल देशमुख आणि नवाब मलिक मतदान करू शकणार नाहीत.
एखाद्या गुन्ह्यात लोकप्रतिनिधी अटकेत असला तो संबधित यंत्रणेच्या कस्टडीत नसून न्यायालयीन कोठडीत असेल तर तो लोकप्रतिनिधी मतदान करण्याचं कर्तव्य बजावू शकतो. या पूर्वी अशा अनेक घटनांमध्ये न्यायालयाने परवानगी दिलेली आहे, असा युक्तीवाद मलिक यांचे वकील ऍड अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी नाकरल्यानंतर आता राष्ट्रवादीने उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. वेळ अत्यंत कमी असल्यामुळे उच्च न्यायलयात आजच सुनावणी होते का शुक्रवारी याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यसभा निवडणुकीला अवघी एक दिवसा राहिला आहे.