महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती निमित्त खा. शरद पवार यांची भेट
गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती निमित्त खा. शरद पवार यांची भेट
गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी व शिवसेना, काँग्रेस, मित्रपक्षांच्या सहकार्याने स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार हे एक वर्ष कार्यकाल झाल्यामुळे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड राजेंद्र काळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गोविंदबाग येथे जाऊन भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्याबरोबर बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव उपस्थित होते महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेसाठी पवार साहेबांनी निर्णायक भूमिका घेऊन महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्या रूपाने एक कर्तुत्ववान मुख्यमंत्री दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली 27 नोव्हेंबर रोजी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे शरद पवार यांनी सर्व पक्षांना एकत्र आणून राजकीय समीकरण बदलले होते त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेंद्र काळे यांनी त्यांची भेट घेतली ॲड राजेंद्र काळे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वेळा पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन केलेले आहेत परंतु शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्या एकत्रित येण्यामुळे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष काळे यांनी पवार साहेबांची भेट घेतली
मी गोविंद बाग व इतर ठिकाणी अनेक वेळा यापूर्वी आंदोलन केले आहेत मात्र विकास आघाडीच्या माध्यमातून राज्याला उद्धव साहेबांच्या रुपाने सक्षम मुख्यमंत्री पवार साहेबांनी दिला त्यामुळे प्रथम त्यांचे गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.