महाविकास आघाडीत राहायचे की नाही कठोर निर्णय घेण्याची वेळ! माजी खासदार राजू शेट्टी
विधानपरिषदेत स्वाभिमानीला एक जागा द्यायची असा शब्द दिला होता.
महाविकास आघाडीत राहायचे की नाही कठोर निर्णय घेण्याची वेळ! माजी खासदार राजू शेट्टी
विधानपरिषदेत स्वाभिमानीला एक जागा द्यायची असा शब्द दिला होता.
प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ‘बोलताना तसे संकेत दिले. महाविकास आघाडीने आमची सर्व पातळ्यांवर निराशा केली आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
येत्या 5 एप्रिल रोजी पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुका अवघ्या दोन वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे सरकार जुल्मी सरकार आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात सत्ताधारी आणि विरोधक मग्न झाले आहे. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रं यावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
राजू शेट्टी यांच्या नाराजीचे मुद्दे
केंद्र सरकारने भूसंपादनाच्या पाच पट मोबदल्याचा कायदा दोन पटीवर आणला. कर्जमाफी-पिकविमा, दिवसा वीज हे महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा काढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. तसंच ऊस उत्पादकांच्या एफआरपीचेही राज्य सरकारने तुकडे केलं, असंही स्वाभिमानीचं मत आहे.
भाजपकडून राजू शेट्टी यांना ऑफर
राजू शेट्टी हे शेतकर्यांचे नेते आहेत, त्यांचीही काही प्रश्न असतात, त्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे, आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टी हे झुंजार नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते प्रामाणिकपणे लढत असतात, राजू शेट्टी हे महाविकास आघाडी मधून बाहेर पडून भाजप सोबत यायला तयार असतील तर त्याचे स्वागत आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.