महाविकास आघाडी सरकार हे स्वतःच्या कर्णीने लवकरच कोसळेल-रामदास आठवले
इंदापूर येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य
महाविकास आघाडी सरकार हे स्वतःच्या कर्णीने लवकरच कोसळेल-रामदास आठवले
इंदापूर येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य
इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
आज दि.७ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सुनिश्चित दौऱ्यावर असता इंदापूर येथे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी काही काळ होते. यावेळी पत्रकार परिषदेत आठवलेंना राज्य सरकारच्या कामकाजाविषयी विचारले असता केंद्रीय मंत्री आठवलेंनी त्यांच्या शैलीत पत्रकारांना बोलताना महाविकास आघाडी सरकार हे तीन पायाचे आहे ते स्वतःच्या कर्णीने लवकरच कोसळेल तेव्हा सरकार बनवण्याची आमची तयारी आहे असे सूचक वक्तव्य आठवलेंनी केले.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक विषयांमध्ये मतभेद असून राज्यातील सरकार हे पाडण्याची गरज नसून तशी आवश्यकता देखील नाही सरकार पाडायचे असते तर सुरुवातीच्या एका महिन्यातच पाडले असते, त्यामध्ये आम्हाला कोणताही रस नाही, परंतु काँग्रेस पक्ष कधी या सरकार मधून बाहेर निघेल आणि सरकार पडेल हे कळणार देखील नाही असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.
शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना आठवले म्हणाले की,काँग्रेसने देखील त्यांच्या जाहीरनाम्यात सरकार आल्यास अशा पध्दतीचा कायदा करू असा उल्लेख केला आहे.हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असून जाणूनबुजून राजकारण केलं जात आहे परंतु दि.९ रोजी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघू शकेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील,रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे,रिपाइंचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे,नितीन आरडे,महेश सरवदे,प्रवीण मखरे,हनुमंत ठोकले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.