इंदापूर

महावितरण अधिकाऱ्यांबरोबरची चर्चा फिस्कटली ; महावितरण कार्यालयात हर्षवर्धन पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा ठिय्या

सरकार विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी

महावितरण अधिकाऱ्यांबरोबरची चर्चा फिस्कटली ; महावितरण कार्यालयात हर्षवर्धन पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा ठिय्या

सरकार विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी

इंदापूर : प्रतिनिधी
थकीत वीज बिलामुळे इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तो पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी तसेच राज्य सरकार व महावितरणच्या कारभाराविरोधात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी पासूनच (दि.२७) महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.सायंकाळी तहसीलदार श्रीकांत पाटील,कार्यकारी अभियंता एम.एस मिसाळ,श्री सूर्यवंशी, विद्युत वितरण चे उप अभियंता रघुनाथ गोफणे यांच्यामध्ये चर्चा झाली मात्र त्यामध्ये तोडगा निघाला नसल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून महावितरणच्या सबस्टेशन परिसरात आंदोलनकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की,सकाळी पासून आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू होते. बारामती विभागाचे अधिकारी हे चर्चेला आले परंतु अधिकाऱ्यांनी चालुची पाच लाईटबिले भरली पाहिजेत तसेच मागची थकबाकी देखील भरली पाहिजेत तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने लाईट कनेक्शन पूर्ववत करता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे ते आम्हाला मान्य नाही.महाराष्ट्रात इतर ठिकाणी वेगळा न्याय आणि इंदापूर तालुक्यासाठी वेगळा न्याय हे राजकीय दृष्ट्या जाणूनबुजून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर घोर अन्याय होत आहे. त्यामुळे महावितरणच्या सबस्टेशन मध्ये आम्ही धरणे सुरू केलं आहे.तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी होत आहेत.महाविकास आघाडी सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी हे आंदोलन शेतकऱ्यांवर दडपशाही व अन्याय करून मोडण्याचं ठरवलं आहे हे आम्ही सहन करणार नाही.खपवून घेणार आहे.शांततेत आंदोलन करणार असून कायदा हातात न घेता जोपर्यत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील अस सांगितले.

दरम्यान उपस्थितांकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो,लोकप्रतिनिधी चा निषेध असो,भारत माता की जय,जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी करण्यात आली.

या ठिकाणी हजारो कार्यकर्ते उपस्थित असून कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button