महिलांनी आर्थिक स्वालंबन व्हावे : शुभांगी चौधर
विविध क्षेत्रातील महिला उपस्तीत होत्या
बारामती वार्तापत्र
महिलांनी संसार चालवीत असताना आर्थिक दृष्ट्या स्वालंबन होणे साठी शासनाच्या विविध योजना चा लाभ घेऊन किंवा विविध संस्थेच्या मार्गदर्शनाखाली उद्योग सुरु करून उत्तम गृहणी व उत्कृष्ट लहू उद्योजिका होऊ शकतात असे प्रतिपादन त्रिवेणी ऑइल अँड फूड प्रॉडक्टस च्या संचालिका शुभांगी चौधर यांनी केले.
त्रिवेणी ऑइल अँड फूड प्रॉडक्टस च्या वतीने विविध क्षेत्रातील उद्योजिका महिला यांच्या कला, गुणांना वाव मिळणेसाठी’ त्रिवेणी कट्टा ‘चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शुभांगी चौधर बोलत होत्या या प्रसंगी अजिंक्य बिग बझार च्या संचालिका धनश्री गांधी, लेखिका व कवियत्री मंगला बोरावके, खाद्य व्यवसायिका आनंदी निबंधे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ विश्वगंधा शिंदे, बारामती ग्रामीण च्या पोलीस हवालदार अंजली नागरगोजे , आदी विविध क्षेत्रातील महिला उपस्तीत होत्या.
या वेळी विविध क्षेत्रातील महिलांनी नौकरी, व्यवसाय, संसार यामधील सुख दुःखाचे अनुभव कथन करून नोकरी व्यवसाय सांभाळत यशस्वी संसार करण्याचे गमक सांगितले व त्रिवेणी कट्टया मुळे माहेरी आल्याचा आनंद मिळत असल्याचे सांगितले आभार राधिका घोळवे यांनी मानले.