महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षित झाले पाहिजे – डी.वाय.एस.पी,नारायण शिरगावकर
महिलांनी व मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घेऊन आत्मसात केले पाहिजे

महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षित झाले पाहिजे – डी.वाय.एस.पी,नारायण शिरगावकर
महिलांनी व मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घेऊन आत्मसात केले पाहिजे
बारामती वार्तापत्र
जागतीक महिला दिननिमित्त बारामती कराटे क्लब चा कौतुकास्पद उपक्रम खास मुली व महिलांसाठी इंटरनॅशनल कराटे महिला प्लेयर मार्फत प्रशिक्षण या कार्यक्रमाची सुरवात dysp नारायण शिरगावकर यांच्या हस्ते श्री फळ फोडून करण्यात आली या क्लब च्या विद्यार्थ्यांनी धाडाकेबाज प्रात्यक्षिक दाखवले
सर्व प्रमुख पाहुण्यांना व पालकांना मुली व महिलांसाठी काळाची गरच पाहता हे कराटे किती महत्त्वाचे हे दाखवुन दिले. महिलांनी व मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घेऊन आत्मसात केले पाहिजे म्हणजे अडचणीच्या वेळी गुन्हेगारांना प्रतिकार केला जाऊ शकतो. असे मत शिरगावकर यांनी मार्गदर्शन करताना केले व क्लबचे कौतूक देखील केले.
यावेळी नगरसेविका अनघाताई जगताप, नगरसेविका डाॅ.सुहासणी सातव, नगरसेविका अनिताताई जगताप, पुण्यनगरीचे बारामती विभागाचे प्रमुख अमोल यादव,क्लब चे प्रमुख मिननाथ भोकरे,दिनेश जगताप,योगेश ढवान,धीरज पवार,ओंकार पाठक,अमोल भिंगारे,समिर ढोले आणि पालक व विद्यार्थी उपस्थितीत होते
या कराटे क्लब मध्ये मुली व महिलांसाठी व 14 वर्षे आतील मुलांसाठी प्रशिक्षण व ॲडमिशन चालु आहे पहिल्या 50 ॲडमिशन घेणार्या विद्यार्थ्यांना ड्रेस फ्रि दिले जाणार आहे या कार्यक्रमाची प्रस्तावांना प्रशिक्षिका शिवानी काटे-देशमुख कदम यांनी मांडली व आभार रुपाली गिरमे यांनी केले.