महिला दिनानिमित्त ‘सावित्री सन्मान’ पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा गौरव
'संगीत रजनी' कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त ‘सावित्री सन्मान’ पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा गौरव
‘संगीत रजनी’ कार्यक्रमाचे आयोजन
बारामती वार्तापत्र
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘सावित्री सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.
हा सोहळा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद बारामती तालुका व मएसो संस्थेच्या बारामतीमधील सर्व प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने देशपांडे विद्यालयाचे शाला समिती अध्यक्ष अजय पुरोहित व महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शिक्षक परिषदेचे बारामती तालुका अध्यक्ष दादासाहेब वनवे, शाळा समन्वय पुरुषोत्तम कुलकर्णी, उपमुख्याध्यापक राजाराम गावडे, पर्यवेक्षक शेखर जाधव, दिलीप पाटील, जयश्री शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा, कला, क्रीडा, व्यवसाय, उद्योजकता, संरक्षण आणि उत्तम गृहिणी या क्षेत्रातील महिलांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देवून पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सावित्री सन्मानाच्या सन्मानार्थी : रोहिणी गायकवाड (शिक्षण) , अनिता गवळी (व्यवसाय ), वृषाली बांदल (न्याय), वनिता कदम (संरक्षण) , सिंधू गोफणे (व्यवसाय), डॉ.निता हडपकर (रुग्णसेवा),अर्चना देवकाते (अर्थ) , सोनाली क्षीरसागर (शिक्षण) , यशोदा पिसे (गृहिणी), अनिता तावरे (शिक्षण), सुप्रिया इनामदार (समाजसेवा), सपना ननवरे (व्यवसाय व क्रीडा) , मनिषा जराड (गृहिणी) , गीता जाधव ( आदिवासी कल्याण), मोनिका खेडेकर (शिक्षण), शुभांगी दणाणे (संरक्षण)प्रमुख पाहुण्यांनी महिलांच्या कार्याची स्तुती करताना सांगितले की, “समाजाच्या सर्वच क्षेत्रांत महिलांनी मोठी प्रगती केली आहे.
त्यांचे कष्ट, जिद्द आणि ध्येयप्रेरित मानसिकता ही नवी पिढीच्या महिला उद्योजक आणि तरुण महिलांसाठी प्रेरणादायी आहे.” सन्मानार्थी महिलांमध्ये रोहिणी गायकवाड, सिंधू गोफणे, सुप्रिया इनामदार, वनिता कदम यांनी मनोगते व्यक्त करून पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल प्रशालेचे व शिक्षक परिषदेचे आभार मानले.
सन्मान चिन्हाचे सौजन्य केल्याबद्दल बारामतीचे कापड उद्योजक व व्यवसायिक नरेंद्र मोता यांचेही आभार मानण्यात आले. कार्यक्रमात खास महिलांसाठी ‘संगीत रजनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे बारामती तालुका कार्याध्यक्ष रवींद्र गडकर, खजिनदार राजेंद्र जगताप, कार्यवाह सोमनाथ जंजिरे, सहकार्यवाह आशिष केंडे, कार्यकारणी सदस्य अमित पाटील, सुनील खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सनगर व सनत खोत यांनी केले तर आभार अमित पाटील यांनी मानले .