महिला बालकल्याण विभागाकडून विविध योजना अंतर्गत प्रस्तावांना मंजुरी : रोहिणी तावरे
संबधितांनी वस्तु खरेदी करुन वेळेत पंचायत समिती बारामती कार्यालयाकडे देयक मागणी प्रस्ताव सादर करावा.
महिला बालकल्याण विभागाकडून विविध योजना अंतर्गत प्रस्तावांना मंजुरी : रोहिणी तावरे
संबधितांनी वस्तु खरेदी करुन वेळेत पंचायत समिती बारामती कार्यालयाकडे देयक मागणी प्रस्ताव सादर करावा.
बारामती वार्तापत्र
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बारामती तालुक्यात विशेष प्राविण्या मिळविलेल्या विद्यार्थीनींना आर्थिक मदत, मुलींना संगणक प्रशिक्षण ,महिलांना पीठ गिरणी , तेलघाणा, सोलर वॉटर हिटर,शिलाई मशीन , योजनेचे प्रस्ताव मंजुर झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सदस्या सौ.रोहिणी रविराज तावरे (लाखे) यांनी दिली आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष प्राविण्य योजनेतुन इयत्ता १०वी व १२ वी पास १३९ विद्यार्थींनींना प्रत्येकी पाच हजार रुपये मिळणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगणक प्रशिक्षण योजनेतुन ८ मुलींना लाभ मिळणार आहे. पीठ गिरणी – १७८, तेलघाणा- ६, सोलर वॉटर हिटर- २८, शिलाई मशीन – १२२ इत्यादी वस्तु जिल्हा परिषद कडुन महिलांना मंजुर झालेल्या आहेत.
संबधितांनी वस्तु खरेदी करुन वेळेत पंचायत समिती बारामती कार्यालयाकडे देयक मागणी प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर अनुदानाची रक्कम संबधितांच्या बँक खात्यावर जमा होईल .उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती कडील विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. असे सौ.रोहिणी रविराज तावरे (लाखे) यांनी सांगितले.