महिला बाल कल्याण च्या वतीने दिव्यांग अनुदान वाटप
नगराध्यशा पौर्णिमा तावरे यांनी महिला बाल कल्याण विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
महिला बाल कल्याण च्या वतीने दिव्यांग अनुदान वाटप
नगराध्यशा पौर्णिमा तावरे यांनी महिला बाल कल्याण विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद च्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग शिष्यवृत्ती योजने अंतर्गत 48 विद्यार्थ्यांना दोन लाख छपन्न हजार व स्वयंरोजगार अर्थसाह्य योजना अंतर्गत 35 लाभार्थी यांना तीन लाख पन्नास हजार रुपये चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव ,गटनेते सचिन सातव,महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती आशा माने,उपसभापती ज्योती सरोदे,विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते,नगरसेवक विष्णू चौधर,नगरसेविका कमल कोकरे,मयुरी शिंदे,अनिता जगताप,सविता जाधव,नीता चव्हाण व मुख्यधिकारी महेश रोकडे,महिला बाल कल्याण च्या विभाग प्रमुख आरती पवार,शहर अभियान व्यवस्थापक अल्ली मुल्ला,सहायक सविता खरात व जळोची चे माजी सरपंच दतात्र्य माने , प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष मृत्यूनजय सावंत आणि लाभार्थी ,पालक उपस्तीत होते.
प्रतिभा महिला प्रशिक्षण योजना मार्फत एम एस आय टी ,मराठी टायपिंग,स्पोकन इंग्लिश आदी साठी महिला बालकल्याण विभाग महिलांना सहकार्य करत असून महिला सक्षमीकरण साठी महिला बचत गटांना साह्य व दिव्यांग साठी विविध योजनेच्या माध्यमातून मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे सभापती आशा माने यांनी सांगितले.
नगराध्यशा पौर्णिमा तावरे यांनी महिला बाल कल्याण विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
वयोश्री योजना माहिती व अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्गदर्शन प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष मृत्यूनजय सावंत यांनी दिली
याप्रसंगी सचिन सातव,सविता जाधव,सुनील सस्ते,महेश रोकडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
महिला बाल विकास व शासनाच्या विविध योजनांची माहिती विभाग प्रमुख आरती पवार व वसुंधरा अभियान बदल माहिती अल्ली मुल्ला यांनी दिली.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हरित शपथ देऊन सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.तर आभार उपसभापती ज्योती सरोदे यांनी मानले.