स्थानिक

महिला हॉस्पिटल,बारामती येथे जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांगांना एडीप योजनेअंतर्गत सहायक साधनांचे मोफत वाटप

बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी गाड्यांचे वाटप पु

महिला हॉस्पिटल,बारामती येथे जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांगांना एडीप योजनेअंतर्गत सहायक साधनांचे मोफत वाटप

बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी गाड्यांचे वाटप पु

बारामती वार्तापत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे संकल्पनेतील तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,अपंग हक्क विकास मंच,केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,जिल्हा प्रशासन,जिल्हा परिषद पुणे,महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या संस्थांच्या वतीने आयोजीत करण्यात आले आहे.

दिव्यांगदिनाचे औचित्य साधून अऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या काही पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात स्वयंचलित बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी गाड्यांचे वाटप पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते पात्र लाभार्थी नंदा जाधव रा.सदोबाचीवाडी, दादासो बरकडे रा.वडगांव निंबुत,भगवान कुंभार रा.पारवडी,बिपीन शहा रा.माळेगाव व सुलभा खापले रा.बारामती आदींना वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अध्यक्ष सुनील बनसोडे,स्वीय सहाय्यक नितीन सातव,बारामती तालुका यशस्विनी सामाजिक अभियान सहसमन्वयिका दिपाली पवार, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटणीस शीला पवार, वर्षा ठोंबरे आदींसह पात्र लाभार्थी उपस्थित होते.

साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांसाठी मोरगाव, सुपे व महिला हॉस्पिटल,बारामती याठिकाणी पूर्वतपासणी शिबीराचा उद्या आणि पर्वा शनिवार व रविवार असे दोन दिवस असल्याने नागरिकांनी आवश्यक वस्तूंचा लाभ मिळविण्याकरिता पूर्वतपासणी करून घेण्याचे आवाहन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram