मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक वनविभाग व बारामती पोलिसांची कामगिरी
या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे
मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक वनविभाग व बारामती पोलिसांची कामगिरी
या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलिसांना खबऱ्यामार्फत दोन इसम मोटर सायकल वरून मांडूळाची तस्करी करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी दोन इसमांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिकचौकशी केली
असता त्यांनी मांडूळ विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
या दोघांना मांडुळासह पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. याप्रकरणी गणेश लक्ष्मण गायकवाड (वय २५, रा. पाटण सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) व राजेंद्र उत्तम चांगण (वय ५३, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या इसमांची नावे आहेत त्यांना वनविभागाच्याताब्यात दिले आहे. सोमवारी (दि. १४) दुपारी दोनच्या सुमारास विद्या प्रतिष्ठान येथील नक्षत्र गार्डन येथे ही कारवाई करण्यात आली.. त्यामुळे पोलिसांनी तेथे जात गणेश गायवाड व राजेंद्र चांगण यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडील पोत्यात एक मांडूळ आढळुन आले. ते विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना त्यांनी दिली.
अंधश्रद्धेतून मुक्या प्राण्यांचा जातोय जीव पैशाचा पाऊस पाडणे ,गुप्तधन मिळवणे अशा वेगवेगळे अघोरी कृत्यांसाठी मांडुळ ,कासव ,खवले मांजर , घोरपड अशा अनेक प्राण्यांचा तस्करीसाठी वापर केला जातो. त्यामुळे या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी म्हणजे भविष्यात असा प्रकार घडणार नाही.
मूळ सूत्रधार शोधावा
पोलीस व वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणातील खरा सूत्रधार शोधावा. हे मांडूळ आणले कुठून आणि विकणार कोणाला ,,त्यांचा उद्देश,, यापूर्वी असे गुन्हे घडले आहेत काय याच्या मुळा पर्यंत पोलिस आणि वनविभागाने जाण्याची गरज आहे ते काम दोन्ही खात्याचे अधिकारी करतील यात शंका नाही.
हि कामगीरी पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक योगेश लंगुटे, हवालदार जयंत ताकवणे, कर्मचारी मंगेश कांबळे, हे करीत आहेत