माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या करणार पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
हर्षवर्धन पाटील यांनी दिली माहिती
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या करणार पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
हर्षवर्धन पाटील यांनी दिली माहिती
इंदापूर:प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (दि.19) रोजी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणेसाठी पुणे जिल्हाच्या दौऱ्यावरती येत आहेत, अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी 10 वा. बारामती विमानतळावरती आगमन होईल. त्यानंतर दौंड तालुक्यातील मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली या भागाची नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 11.45 वा. इंदापूर तालुक्यातील सणसर, निमगाव-केतकी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. तेथून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे माढा (जि. सोलापूर) तालुक्यातील टाकळी, गारअकोले या भागाची पाहणी करणेसाठी जाणार आहेत,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.