माजी विरोधी पक्षनेतेव व नगरसेवक सुनील सस्ते यांचा शास्तीकर गाळ्यांच्या घरपट्टीवर आक्रमक पवित्रा
महाराष्ट्रात कोणतीच नगरपालिका असं करत नाहीत मग तो नियम फक्त बारामतीसाठी का

माजी विरोधी पक्षनेतेव व नगरसेवक सुनील सस्ते यांचा शास्तीकर गाळ्यांच्या घरपट्टीवर आक्रमक पवित्रा
महाराष्ट्रात कोणतीच नगरपालिका असं करत नाहीत मग तो नियम फक्त बारामतीसाठी का
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषद यांच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या सभेत नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक सुनील सस्ते यांनी नागरिकांच्या कारभारासंदर्भात ठोस भूमिका मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.
सभेदरम्यान नगरसेवक सुनील सस्ते यांनी नागरिकांना जुन्या थकीत करातून मुक्त करावे, घरपट्टीवरील लावलेला शास्ती कर (दंडात्मक व्याज) तात्काळ बंद करावा आणि भाडेकरूनची आकारणी करून लावलेली घरपट्टी आकारणी रद्द करावी,अशी जोरदार मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे सभागृहात काही काळ खळबळ उडाली आणि विषयावर सविस्तर चर्चा झाली.
तसेच ज्या नागरिकांनी स्वतःच्या मालकीचा फ्लॅट किंवा गाळा घेतलेला आहे व त्या ठिकाणी भाडे करू ठेवलेला आहे त्याबाबत भाडे करार कोणत्याही झालेला नसला किंवा असला तरीही त्याला जास्तीची आकारणी केली जात आहे महाराष्ट्रात कोणतीच नगरपालिका असं करत नाहीत मग तो नियम फक्त बारामतीसाठी का असा सवाल नगरसेवक सस्ते त्यांनी प्रशासनाला केला अशा जुलमी करातून बारामतीकरांना त्रास देऊ नये
यावर उत्तर देताना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नागरिकांना दिलासा देणारी भूमिका घेत शास्ती कर माफ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,अशी ग्वाही दिली. त्यामुळे थकीत शास्तिकरामुळे घरपट्टीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच,नगरपालिका मालकीच्या गाळ्यांना घरपट्टी लागू करू नये, अशीही मागणी सस्ते यांनी यावेळी केली.नगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांवर घरपट्टी आकारणी योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या मुद्द्यावरही सभागृहात चर्चा रंगली.
या सर्व घडामोडींमुळे येत्या काळात घरपट्टीवरील शास्ती माफ होणार का,तसेच नगरपालिका मालकीच्या गाळ्यांना घरपट्टीतून सूट मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषद प्रशासन याबाबत काय अंतिम निर्णय घेते,यावर बारामतीतील करदात्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.






