माजी सरपंच जयदीप तावरे यांना जामीन मंजूर
समर्थकांनी फटाके फोडून केला आनंद साजरा
माजी सरपंच जयदीप तावरे यांना जामीन मंजूर
समर्थकांनी फटाके फोडून केला आनंद साजरा
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे (माळेगाव बु, बारामती) यांच्यावरील गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पुणे येथील मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला. रविराज तावरे यांनी दिलेल्या जबाबावरून तपास अधिकारी व उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी महिन्यापूर्वी जयदीप यांना मोक्कांतर्गत अटक केली होती.
मात्र गोळीबार प्रकरणात जयदीप तावरे यांचा सहभागी आढळून न आल्याने तसा अहवाल संबंधित तपास अधिकारी शिरगावकर यांनी मोक्का न्यायाधीश जे. पी. अगरवाल यांच्यासमोर सादर केला. अॅड. हर्षद निंबाळकर अॅड. धैर्यशिल जगताप अॅड. सचिन वाघ यांनी जयदीप तावरे यांच्या बाजूने केलेला युक्तवाद न्यायालयाने ग्राह्य धरून जामीन मंजूर केला.
जयदीप तावरे यांना जामीन मिळाल्याची बातमी समजल्यानंतर माळेगाव मध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची अतषबाजी केली.
यावेळी माळेगावचे माजी संचालक दिपक तावरे यांनी म्हटले की, रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार ही गोष्ट निंदनिय आहे.
याप्रकरणी सुरवातीला पकडलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली, त्याबाबत कोणाचेच दुमत नव्हते.
परंतु राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांना अटक झाल्याने गावात विनाकारण तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी निपक्षपाती गोळीबार प्रकरणाचा तपास केल्यामुळेच जयदीपला जामीन मंजूर होण्यास मदत झाली, याचे समधान वाटते.
31 मार्च रोजी झालेल्या या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रथम 4 आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करून अटक केली होती.
प्रशांत पोपटराव मोरे, टॉम उर्फ विनोद पोपटराव मोरे,राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव (सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती)