स्थानिक

जयदीप तावरे यांना मोक्का न्यायालयाची पुढील चार आठवड्याकरिता मुदतवाढ

28 रोजी मोक्का न्यायालयाने आरोपी जयदीप तावरे यांना तात्पुरता जामीन यावर मुक्त केले होते.

जयदीप तावरे यांना मोक्का न्यायालयाची पुढील चार आठवड्याकरिता मुदतवाढ

गोळीबार प्रकरणी मिळाला होता जामीन

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणी मोक्कांतर्गत जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना मोक्का न्यायालयाने हजर राहण्यास पुढील चार आठववड्याची मुदत दिली आहे.

आज मोका कोर्टात हजर राहण्याचे आदेश असल्यामुळे गावात सर्वत्र चर्च्या रंगल्या होत्या. आज काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र माजी सरपंच जयदीप दिलीपराव तावरे यांना कोर्टाने दिलासा दिल्याने समर्थकांना काही काळ का होईना सुटकेचा श्वास सोडला आहे.

रविराज तावरे लाखे यांच्यावर 31 मे 2021 रोजी गोळीबार झाल्याबाबत त्यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य रोहिणी रविराज तावरे लाखे यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता त्यानुसार पोलिसांनी प्रशांत पोपटराव मोरे, विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल यादव यांसह एका नाबालिकाला अटक केली होती.

दरम्यान या प्रकरणी सहा जुलै 2021 रोजी आरोपी जयदीप तावरे यांना अटक केली होती मात्र तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी जयदीप तावरे यांच्याविरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत असे नमूद करून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 169 अन्वये दिनांक 21 जुलै 2021 रोजी पूना मोक्का न्यायालय यांना अर्ज करून त्यास जामिनावर सोडण्याची विनंती केली होती दरम्यान मोक्का न्यायालय श्री जीपी अगरवाल यांनी फिर्यादी रोहिणी तावरे यांना आपले म्हणणे मांडण्याचे बोलावणे केले होते.

राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणी मोक्कांतर्गत जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना अटक करून हजर करण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने दिले होते मात्र जयदीप तावरे यांच्या वकिलांनी ठोस पणे बाजू मांडल्याने न्यायालयाने तावरे यांना हजर राहण्यास पुढील चार आठववड्याची मुदत दिली आहे. या संदर्भात जयदीप तावरे यांच्या बाजूने अॅड.हर्षद निंबाळकर, अॅड.सत्यम निंबाळकर, अॅड.धैर्यशील जगताप यांचे विषेश मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram