राजकीय

ब्राह्मण असल्यामुळेच काही लोक मला टार्गेट करतात; फडणवीसांचा आरोप.

मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

ब्राह्मण असल्यामुळेच काही लोक मला टार्गेट करतात; फडणवीसांचा आरोप.

मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई: बारामती वार्तापत्र रिपोर्ट.

आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला आमचं सहकार्यच राहणार असल्याचं सांगतनाच या प्रश्नी कुणीही केंद्राकडे बोट दाखवू नये, असं आवाहन त्यांनी केलं.माझी जात ब्राह्मण असल्यामुळेच विरोधक मला टार्गेट करतात. कोणत्याही गोष्टीचं खापर माझ्यावर फोडून मोकळे होतात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

जनतेला एखादी गोष्ट पटवून देता आली नाही तर संभ्रम निर्माण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे आताचं सरकार जे काही होईल, त्याचं खापर मागच्या सरकारवर फोडण्याचं काम करत आहे. एखाद्या गोष्टीत अपयश आलं की त्याचं खापर एकतर मागच्या सरकारवर फोडायचं किंवा केंद्र सरकारला त्या गोष्टीला जबाबदार धरायचं असं धोरण सध्याच्या सरकारने अवलंबलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. एबीपी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

एक गोष्ट स्पष्ट बोलतो. खरंतर मी ते बोलू नये. मला शोभत नाही. पण ब्राह्मण असल्याने माझ्या माथी काहीही मारलं तरी चालतं असं बोटावर मोजण्याएवढ्या लोकांना वाटतं. पण मराठा समाजासाठी मी काय केलं हे सर्वांना माहीत आहे. मराठा समाजालाही माहीत आहे. कुणीही अफवा पसरवू नये किंवा गोंधळ निर्माण करू नये, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.

दोन्ही छत्रपतींमध्ये वाद लावू नका

मराठा आरक्षणाचं नेतृत्व कुणी करावं? या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. आमच्यासाठी दोन्ही छत्रपती आदरणीय आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडू नये, वाद लावू नये, असं सांगतानाच दोन्ही छत्रपतींनी मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व करावं, असा तोडगाही त्यांनी सूचवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!