माझ्या रक्तातच काम, खोटंनाटं बोलून पाठीवर हात टाकायला जमतं नाही : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
वाघ्या-मुरळी व गोंधळी कलाकारांच्या महामेळाव्यात केलं भाष्य
माझ्या रक्तातच काम, खोटंनाटं बोलून पाठीवर हात टाकायला जमतं नाही : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
वाघ्या-मुरळी व गोंधळी कलाकारांच्या महामेळाव्यात केलं भाष्य
इंदापूर : प्रतिनिधी
माझ्या रक्तातच काम आहे.खोटंनाटं बोलून पाठीवर हात टाकायचा हे लबाडीच वागणं मला जमतच नाही असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,ते इंदापूर तालुक्यातील चौपन्न फाटा येथे आयोजित वाघ्या-मुरळी व गोंधळी कलाकारांच्या मेळाव्यात शनिवारी (दि.३०) बोलत होते.
पुढे बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,जनतेसाठी काम करतोय हे उपकार नाहीत.लोकप्रतिनिधी या नात्याने ते माझं कर्तव्यच आहे. ज्या भावनेने विश्वासाने इंदापूर तालुक्यातील जनतेने मला प्रामाणिकपणे खुर्चीवर बसवलं त्या खुर्चीचा उपयोग शोबाजी करण्यासाठी किंवा गाडीत बसून मंत्री म्हणून मिरवण्यासाठी नाही.सर्वसामान्य माणसांच्या समस्या आहेत.त्या सोडविण्याकरिता मी स्वतः उभा आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. शेवटी आनंद द्यायचा असतो, आनंद घ्यायचा असतो, सर्वांना अडचणी असतात त्यातून मार्गक्रमण करणे महत्त्वाचं असतं.दिवस येतील जातील परंतु नेहमी सर्वांसाठी चांगलं काम करायचं आहे.
यावेळी वाघ्या मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मार्तंड साठे,तालुकाध्यक्ष धोंडीराम कारंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, सचिन सपकळ यांसह वाघ्या-मुरळी व गोंधळी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.