मापात पाप अन् शेतकऱ्याला ताप; बारामती, इंदापूरच्या दूध डेअरींची संगनमताने २१ लाखांची फसवणूक; चौघांविरोधात गुन्हा दाखल
लिहिताना चुकल्याने खाडाखोड झाल्याचे सांगितले.

मापात पाप अन् शेतकऱ्याला ताप; बारामती, इंदापूरच्या दूध डेअरींची संगनमताने २१ लाखांची फसवणूक; चौघांविरोधात गुन्हा दाखल
लिहिताना चुकल्याने खाडाखोड झाल्याचे सांगितले.
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडी व इंदापूरातील एका डेअरीची संगनमताने २० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वजनकाटा ऑपरेटर पवन पठारे, टॅंकर चालक शरद गेजगे, शिवांश दूध डेअरीचे मालक खुळपे तर अनिता लेंडवे दूध डेअरीचे मालक बंडू लेंडवे ही गुन्हा दाखल झालेल्या चार जणांची नावे आहेत.
२० ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. डेअरीमध्ये वनजकाटा ऑपरेटर म्हणून पवन पठारे हा काम करत होता. शरद गेजगे हा टॅंकर चालक तर खुळपे हे शिवांश दूध डेअरीचे मालक आणि बंडू लेंडवे हे अनिता लेंडवे दूध डेअरीचे मालक आहेत. २६ फेब्रुवारी रोजी फिर्यादीने रजिस्टरची पाहणी केली असता त्यात खाडाखोड झाल्याचे दिसून आले. त्यावरून त्यांनी पठारे याच्याकडे विचारणा केली असता त्याने लिहिताना चुकल्याने खाडाखोड झाल्याचे सांगितले.
परंतू व्यवस्थापक शिर्के यांनी संगणक सॉफ्टवेअर तपासले असता दूध टॅंकरच्या वजनकाट्यात फेरफार झाल्याचे लक्षात आले. सखोल चौकशीनंतर टॅंकर चालक शरद गेजगे याने त्याच्या ओळखीच्या खुळपे आणि लेंडवे यांच्या डेअरीवरून येणाऱ्या दुधाच्या वजनात फेरफार करण्याबाबत पठारे याच्याशी संगनमत केले. या चौघांनी मिळून बारामती व इंदापूरमधील प्रमुख डेअऱ्यांची सुमारे २० लाख ६८ हजाराची फसवणूक केली असल्याचे लक्षात आले.