आपला जिल्हा

माळवाडी पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार सौ.जिजाताई हनुमंत रेडेके यांची प्रचारात आघाडी 

जिजाताई रेडके यांना गावागावांतील समस्यांची चांगलीच जाण

माळवाडी पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार सौ.जिजाताई हनुमंत रेडेके यांची प्रचारात आघाडी 

सौ.जिजाताई रेडके यांना गावागावांतील समस्यांची चांगलीच जाण

आदित्य बोराटे 

माळवाडी पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार सौ. जिजाताई हनुमंत रेडके यांना पंचायत समिती निर्वाचन गणातील गावा गावातील वाड्या वस्त्यांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मतदारंचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता अपक्ष उमेदवाराचा विजयाचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला आहे. असा ठाम विश्वास माळवाडी पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार यांचे पती हनुमंत रेडके यांनी व्यक्त केला आहे.

रस्ते,पाणी पुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य व विविध मूलभूत सुविधांच्या माध्यमातून सरकारच्या योजना गावागावातील नागरिकां पर्यंत प्रभाविपणे पोहोचवण्यात सौ. जिजाताई रेडके यशस्वी ठरल्या आहेत. हेच मुद्दे आज प्रचाराचा मोठा विषय ठरत असल्या्चे चिन्न आहे.विरोधकांकडे सांगणयासारखे काहीच उरलेले नाही.

इंदापूर तालुक्यातील वडापुरी -माळवाडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो. अतिशय संवेदनशील अशा महत्त्वाच्या पंचायत सामिती गणात सौ.जिजाताई रेडके यांनी निवडणूक प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. त्याचा प्रत्यय हा निवडणुक प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे. मितभाषी स्बभाव असलेले पण तितकेच करारी बाणा व्यक्कतीमत्व असलेल्या कर्तव्यदक्ष जिजाताई रेडके यांना गावागावांतील समस्यांची चांगलीच जाण आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या करिश्म्याने सर्वाना आापलेसे केले आहे यामुळे ग्रामस्थ व महिला त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात सामिल झाले असून त्यामुळे निवड़णूक प्रचारा दरम्यान पंचायत समिती गणातील गाव व वाड्या वस्त्यांवर प्रतिसाद चांगला मिळत आहे.

Back to top button