स्थानिक

माळेगांवचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक करा. मोक्का न्यायालयाचे आदेश

पोलिसांनी केलेला अहवाल मोक्का न्यायालयाने फेटाळला

माळेगांवचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक करा. मोक्का न्यायालयाचे आदेश

पोलिसांनी केलेला अहवाल मोक्का न्यायालयाने फेटाळला

बारामती वार्तापत्र

माळेगाव येथील रविराज तावरे गोळीबारप्रकरणी मोक्कांतर्गत गुन्ह्यात जामीन मिळालेले माळेगावचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचा पोलिसांनी सादर केलेला अहवाल मोक्का न्यायालयाने फेटाळला असून जयदीप यांना १८ ऑगस्टपर्यंत शरणागती पत्करण्याचा आदेश दिला आहे. मोक्का न्यायालयात आम्ही तपासाअंती सादर केलेला अहवाल नाकारण्यात आला असून जयदीप यांना १८ तारखेपर्यंत शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

काय आहे प्रकरण –

३१ मे रोजी रविराज तावरे यांच्यावर माळेगावात गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत पोपटराव मोरे, टॉम ऊर्फ विनोद पोपटराव मोरे, राहूल ऊर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीनावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. रविराज तावरे यांना रुग्णालयात उपचार घेताना दिलेल्या जबाबावरून याप्रकरणी पोलिसांनी जयदीप तावरे यांच्यावर कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तसेच मोक्कांतर्गत त्यांच्यावरही कारवाई झाली होती. जयदीप तावरे यांच्यावरील कारवाईनंतर माळेगावातील राजकीय वातावरण चिघळले होते. जयदीप यांच्या समर्थनार्थ गाव बंद ठेवत निषेध सभा घेण्यात आली होती. तर रविराज तावरे यांनी राजकीय हेतूने जयदीप यांना गोवल्याचा आरोप करत तसे निवेदन पोलिसांना दिले होते. पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा चौकशी केल्यानंतर जयदीप यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मोक्का न्यायालयाकडे सादर केला. या अहवालामुळे जयदीप यांना जुलैअखेरीस जामीन मंजूर झाला होता. परंतु, आता मोक्का न्यायालयाने पोलिसांनी दिलेला अहवाल अमान्य केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!